Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाडा पोलीसांची धडक कारवाई; सुमारे पाच लाखांचा गुटखा जप्त, आरोपीला अटक

मोखाडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत ४.८४ लाख रुपयांचा गुटखा आणि वाहन जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात मोठा इशारा मानली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2025 | 05:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: पालघर जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मोखाडा पोलीस ठाण्याने अशाच एका कारवाईत तब्बल ४.८४ लाख रुपयांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार १० जुलै २०२५ रोजी मोखाडा पोलिसांना नाशिकहून जव्हारकडे येणाऱ्या एका वाहनामधून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

Thane News : एसीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांना काय कळणार ? खड्डयांमुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांचा संताप

सदर माहितीच्या आधारे पवारपाडा गावाजवळ नाशिक-जव्हार रोडवर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी टाटा इंट्रा (MH-48-CQ-3034) ही संशयित गाडी थांबवली. गाडीचा चालक मुजिब अजगर मनियार (वय ४८, रा. मेन रोड, मोखाडा) याने गाडीत कुरकुरे, गाद्या व पडदे असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली असता, आतमध्ये २,३४,२०० रुपये किमतीचा विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला, जो राज्य शासनाने बंदी घातलेला आहे.

या कारवाईत गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी मिळून एकूण ४,८४,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ११८/२०२५ नोंदवून, त्याच्यावर भारतीय दंड संहिता, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिक पोकळे हे करत आहेत.

१२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’ मध्ये समावेश, राज ठाकरेंनी दिला इशारा – ‘ही गोष्ट हलक्यात घेतल्यास…’

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, पो.उ.नि. श्रीकांत दहिफळे, प्रतिक पोकळे, तसेच स्थानीय गुन्हे शाखा पालघरचे अधिकारी आणि मोखाडा पोलीस ठाण्याचे पथक सहभागी झाले होते. या कारवाईने जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतूक व विक्रेत्यांना मोठा इशारा मिळाला असून, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

Web Title: Mokhada police take drastic action gutkha worth around five lakhs seized accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

विम्याची भरपाई द्यावी अन्यथा मेलेली म्हैस पदरात घ्यावी… शेतकऱ्याची बॅंकेकडे उद्विग्न मागणी
1

विम्याची भरपाई द्यावी अन्यथा मेलेली म्हैस पदरात घ्यावी… शेतकऱ्याची बॅंकेकडे उद्विग्न मागणी

मोखाड्यातील बोरशेती मधील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात! आरोग्य विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश
2

मोखाड्यातील बोरशेती मधील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात! आरोग्य विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

मोखाड्यातील बोरशेती मध्ये गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण! २० रुग्णांवर उपचार सुरू
3

मोखाड्यातील बोरशेती मध्ये गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण! २० रुग्णांवर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.