Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nilesh Sambare Case: राजकीय वैमनस्यातून दाखल केला ‘तो’ गुन्हा! नीलेश सांबरे प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे ताशेरे

Nilesh Sambare Case : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या बिलावरून नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामागे उघडपणे राजकीय हेतू आणि राजकीय वैमनस्य असल्याचे ताशेरे ओढत मुंबई हायकोर्टाने सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार नीलेश सांबरे यांना मोठा दिलासा दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 08, 2026 | 02:20 PM
नीलेश सांबरे प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे ताशेरे ( सौजन्य - सोशल मीडिया )

नीलेश सांबरे प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे ताशेरे ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • राजकीय वैमनस्यातून ‘तो’ गुन्हा दाखल
  • नीलेश सांबरे प्रकरणात हायकोर्टाचे निरीक्षण
  • ऐन राजकीय धामधुमीच्या काळात दिलासा
Nilesh Sambare Case : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या बिलावरून नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामागे उघडपणे राजकीय हेतू आणि राजकीय वैमनस्य असल्याचे ताशेरे ओढत मुंबई हायकोर्टाने सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार नीलेश सांबरे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे अंतरिम आदेश देत त्यांना दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांच्या एकलपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. ( Nilesh Sambare Case )

Illegal Firecracker Factory : विरारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा! 3 जणांवर गुन्हा; 13 लाखांचा साठा जप्त

नीलेश सांबरे यांनी २०१५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक विकासकाम पूर्ण केले होते. या कामाचे बील दीर्घकाळ थकीत होते. सांबरे यांनी या कामाच्या मोबदल्याची मागणी केल्यानंतर त्यांना शासनाकडून ७३ लाख १३ हजार ८८४ रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर म्हणजेच २०२६ मध्ये अर्थसंकल्पीय गणना प्रणालीतील (बजेट मिसकॅल्क्युलेशन) त्रुटींच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली.

नोटीस बजावून रक्कम तत्काळ परत करण्याचे आदेश

या चौकशीत ही रक्कम संबंधित कंत्राटदाराला अनावधानाने अदा झाल्याचा निष्कर्ष काढत सार्वजनिक बांधकाम विभागाने सांबरे यांना नोटीस बजावून रक्कम तत्काळ परत करण्याचे आदेश दिले होते. शासकीय नोटीस प्राप्त होताच नीलेश सांबरे यांनी संपूर्ण ७३ लाख १३ हजार ८८४ रुपयांची रक्कम तत्काळ परत केली. या कारवाईविरोधात सांबरे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सुदीप पासबोला यांच्यामार्फत उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली.

कोट्यवधी रुपयांची कंत्राटी कामे केली पूर्ण

याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी उपलब्ध कागदपत्रांची सखोल तपासणी केली. न्यायालयाने याचिकाकर्ते हे केवळ कंत्राटदार नसून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या संस्थेमार्फत अनेक धर्मादाय रुग्णालये, अंध मुलांसाठीच्या शाळा आणि मोफत ग्रंथालये चालवली जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कोट्यवधी रुपयांची कंत्राटी कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. जेव्हा शासनाने रकमेबाबत नोटीस दिली, तेव्हा त्यांनी स्वतःहून संपूर्ण रक्कम तत्काळ धनादेशाद्वारे जमा केली. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असे नमूद केले आहे.

कारवाईपासून अंतरिम संरक्षण

याप्रकरणी हायकोर्टाने सांबरे यांना अंतरिम संरक्षण मंजूर केले. राज्य शासनाला नोटीस बजावत चार आठवड्यांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर दोन आठवड्यांत याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. अतिरिक्त सरकारी वकील संगीता फड यांनी राज्य सरकारच्यावतीने नोटीस स्वीकारली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या आणि राजकीय धामधुमीच्या काळात नीलेश सांबरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: नीलेश सांबरे यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात आली होती?

    Ans: २०१५ मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका विकासकामाची रक्कम (७३ लाख १३ हजार ८८४ रुपये) बजेट त्रुटींमुळे अनावधानाने मिळाल्याचा आक्षेप घेत विभागाने नोटीस दिली होती, ज्यानंतर रक्कम परत करूनही त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

  • Que: मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात काय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे?

    Ans: या गुन्ह्यामागे उघडपणे राजकीय हेतू आणि राजकीय वैमनस्य असल्याचे नमूद करत न्यायालयाने याचिकाकर्ते सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय असल्याचे आणि नोटीस मिळताच संपूर्ण रक्कम परत केल्याचे स्पष्ट केले.

  • Que: हायकोर्टाने नीलेश सांबरे यांना काय दिलासा दिला आहे?

    Ans: न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांच्या एकलपीठाने सांबरे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे अंतरिम आदेश दिले असून, राज्य सरकारला नोटीस बजावून प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर २०२६ रोजी निश्चित केली आहे.

Web Title: Nilesh sambare case bombay high court relief political animosity marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Maharashtra Political News
  • palghar

संबंधित बातम्या

Varas Land Rights : बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क! कूळ कायद्यात सुधारणेला तत्त्वतः मंजुरी; आदिवासी व कष्टकऱ्यांना मोठा दिलासा
1

Varas Land Rights : बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क! कूळ कायद्यात सुधारणेला तत्त्वतः मंजुरी; आदिवासी व कष्टकऱ्यांना मोठा दिलासा

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी
2

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड
3

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.