Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू; सिजेरियननंतर प्रकृती बिघडली अन् डॉक्टरांनी…

संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नातलगांना पेशंटला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 10:05 AM
प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू; सिजेरियननंतर प्रकृती बिघडली अन् डॉक्टरांनी...

प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू; सिजेरियननंतर प्रकृती बिघडली अन् डॉक्टरांनी...

Follow Us
Follow Us:

नाशिक : कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही तासात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदनानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला.

तताणी (ता.बागलाण) येथील संगीता तात्या पवार (वय ३१) यांना प्रसूतीसाठी गुरुवारी (दि.१६) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिझर प्रसूती करण्यात आली. नवजात बालक व माता सुखरूप असताना शुक्रवारी (दि. १७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मातेला अस्वस्थ वाटत असल्याने संबंधित डॉक्टरांनी पेशंटला अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठवावे लागेल असे सांगितले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नातलगांना पेशंटला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितल्याचा आरोप महिलेचे पती तात्या नारायण पवार यांनी केला. मातेचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातलगांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या दिला.

पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांनी नातलगांच्या भावना समजून घेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नातलगांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, वैद्यकीय डॉ. प्रशांत पाटील यांनी सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

भाजी कच्ची राहिल्याने पती संतापला; पत्नीला बेदम मारहाण केली अन् नंतर पत्नीनेच आयुष्य संपवलं

Web Title: Mother dies within hours of delivery health deteriorates following c section

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Nashik News

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
1

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.