Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Nashik News : भुसावळ विधानसभा मतदारसंघात SIR प्रक्रियेदरम्यान 14,562 मतदारांविरोधात अवघ्या एका दिवसात 186 व्यक्तींच्या नावाने Form-7 हरकती दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 05:27 PM
Voter List SIR

Voter List SIR

Follow Us
Follow Us:
  • भुसावळमध्ये 14,562 मतदारांविरोधात हरकती दाखल
  • एकाच दिवशी 186 व्यक्तींच्या नावाने अर्ज
  • हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
Nashik News : देशभरात आता पुन्हा एकदा SIR विरोधात रान पेटलं आहे. कॉकरोच जनता पार्टी, डाव्या विद्यार्थी संघटना तसेच INDIA आघाडीकडून SIR विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. आता पुन्हा काँग्रेसकडून SIR वरून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. (Bhusawal SIR News)

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. तब्बल 14,562 मतदारांची नावे यादीतून वगळण्याच्या उद्देशाने 186 व्यक्तींच्या नावाने Form-7 हरकती दाखल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे, या सर्व हरकती 12 ऑक्टोबर 2026 रोजी एकाच दिवशी दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून FIR दाखल करण्यासह स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

Cabinet Decisions : राज्य सरकारचे मोठे निर्णय! शिक्षण क्षेत्रातही होणार महत्त्वाचे बदल, जाणून घ्या चार महत्वाचे निर्णय

एकाच दिवशी हजारो हरकती, अर्जांवर संशय

सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार, एक व्यक्ती संपूर्ण दावे आणि हरकतींच्या कालावधीत जास्तीत जास्त 10 Form-7 अर्ज दाखल करू शकते. ही मर्यादा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींसाठी लागू आहे.

मात्र, या निर्देशांनंतर अवघ्या तीन दिवसांत भुसावळमध्ये हजारो हरकती दाखल झाल्याचा आरोप आहे. काही व्यक्तींनी तर आपल्या नावाने अर्ज दाखल झाल्याची माहितीच नसल्याचे लेखी कळविल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. तीन व्यक्तींच्या नावाने तब्बल 463 हरकती दाखल असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.

अनेक अर्जांवर वेगवेगळी हस्ताक्षरे, वेगवेगळ्या शाईचा वापर आणि एकाच पद्धतीने तयार केलेले अर्जांचे गठ्ठे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. काही मतदारांना ‘Absent’ दाखवण्यात आले असून प्रत्यक्षात ते आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर राहत असल्याचेही पत्रात नमूद आहे.

FIR दाखल करा, स्वतंत्र चौकशी करा!

या संपूर्ण प्रकारामागे नेमके कोण आहे, अर्ज कोणी तयार केले आणि संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ते कोणत्या आधारावर स्वीकारले, याचा शोध घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

जळगाव जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत कालबद्ध चौकशी करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.

पात्र मतदारांची नावे वगळू नका!

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या चौकशीच्या नावाखाली कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये. संबंधित मतदारांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकण्याची संधी द्यावी आणि ठोस पुराव्याशिवाय नाव कमी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे कथित बनावट हरकतींच्या प्रकरणात निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतो आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: भुसावळ Form-7 प्रकरण नेमके काय आहे?

    Ans: भुसावळ विधानसभा मतदारसंघात 14,562 मतदारांविरोधात 186 व्यक्तींच्या नावाने Form-7 हरकती दाखल झाल्याचा आरोप आहे. या हरकती 12 ऑक्टोबर 2026 रोजी एकाच दिवशी दाखल झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?

    Ans: या प्रकरणात FIR नोंदवावी, जळगाव जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करावी, जबाबदार व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि पात्र मतदारांची नावे वगळू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Que: Form-7 अर्जांची कमाल मर्यादा किती आहे?

    Ans: सपकाळ यांच्या पत्रातील निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2026 च्या निर्देशांनुसार, एका व्यक्तीला संपूर्ण दावे आणि हरकतींच्या कालावधीत जास्तीत जास्त 10 Form-7 अर्ज दाखल करता येतात. ही मर्यादा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींना लागू असल्याचे पत्रात नमूद आहे.

Web Title: Nashik news bhusawal sir voters fake form 7 objections harshwardhan sapkal vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Congress
  • Harshwardhan Sapkal
  • Nashik News
  • SIR

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख
1

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले
2

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा
3

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा

ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा
4

ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.