Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Language: “भाजपला मराठीबद्दल काडीचे…”; खासदार अरविंद सावंतांची सडकून टीका

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले आहे. 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी भाषेच्या संदर्भात मोर्चा काढणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 28, 2025 | 06:06 PM
Marathi Language: "भाजपला मराठीबद्दल काडीचे..."; खासदार अरविंद सावंतांची सडकून टीका

Marathi Language: "भाजपला मराठीबद्दल काडीचे..."; खासदार अरविंद सावंतांची सडकून टीका

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती: उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले आहे. 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी भाषेच्या संदर्भात मोर्चा काढणार आहेत. त्यावर देखील खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार अरविंद सावंत हे आज अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार अरविंद सावंत म्हणाले, “महाराष्ट्राला ज्या प्रकारे लाचार सरकार लाभले आहे, ते पाहता उभ्या देशात केंद्र सरकारने शिक्षण नीती म्हणून जे काही घोषित केले आहे, त्यात कुठेही तिसरी भाषा शिकवली पाहिजे असे दिलेले नाही. यामुळे हा  महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा आहे.”

पुढे बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, “आम्ही पण शाळेत शिकलो. पाचवीपर्यंत  आराठी शाळेत शिकलो. व्यंकय्या नायडू जे देशाचे उपराष्ट्रपती होते ते देखील मातृभाषेत  शिक्षण घेतलं पाहिजे असा आग्रह करत होते. भारतीय जनता पक्षाच्या कोणालाही मराठीबद्दल काडीचे प्रेम नाही.”

“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने दहा वर्षे झगडणारा हा खासदार अरविंद सावंत आहे. उद्धव ठाकरे आणि आज ठाकरे दोन बंधू एकत्र येत आहे. मराठी भाषेचा सक्तीचा जीआर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काढण्यात आला होता. 5 जुलै त्या दिवशी मराठीचा जागर महाराष्ट्राच्या राजधानीत होणार आहे, ” असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

Sadabhau Khot : मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात आहेत; सदाभाऊ खोतांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

सदाभाऊ खोतांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

सध्या राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच, शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी रोखठोक भाषेत मराठी भाषा धोक्यात असल्याचा दावा करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “मराठी भाषा धोक्यात आलेली नाही, तर यातील काहींच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत,” असा टोला त्यांनी लगावला आहे. ५ जुलै रोजी मनसे-शिवसेना एकत्र मोर्चा निघणार आहे, त्यामुळे ही टीका थेट ठाकरे बंधूंवर असल्याची चर्चा आहे.

बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, प्रत्येकाचाच अजेंडा ठरलेला असतो. सध्या अनेकजण मराठीच्या नावाखाली आंदोलन करत आहेत, भाषेची काळजी घेत असल्याचे दाखवतात. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र राजकारण्यांच्या दिशेने जाताना दिसत नाही. “शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा यावर कोणी बोलत नाही, पण भाषा धोक्यात आली, असे सांगून खोटा प्रचार केला जातो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

 

Web Title: Mp arvind sawant criticizes to bjp fadnavis marathi language thackeray morcha mumbai politics amravati news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • Arvind Sawant
  • Marathi language Compulsory
  • Raj Thackeary
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
1

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
2

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार
3

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त
4

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.