Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खारेपाटण येथील पूरातील नुकसानीची खासदार नारायण राणे यांनी केली पाहणी

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी ९ जुलै रोजी खारेपाटण येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 10, 2024 | 11:50 AM
खारेपाटण येथील पूरातील नुकसानीची खासदार नारायण राणे यांनी केली पाहणी
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीची भाजप नेते, केंद्रीय माजी मंत्री खासदार नारायण राणे यांनी ९ जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले त्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला. अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे त्याचा अहवाल पाठवा असे आदेश दिले. पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शुक नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम उन्हाळ्यात युद्ध पातळीवर केले जाईल असे आश्वासन यावेळी खासदार नारायण राणे यांनी दिले.

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील बाजारपेठेत मेडिकल, भूषारी दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, बसस्थानक, मोबाईल शॉप, हार्डवेअर तसेच एका मंदिरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी ९ जुलै रोजी खारेपाटण येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली. बाजारपेठेतील दुकानदारांशी खासदार नारायण राणे यांनी चर्चा करुन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

यावेळी खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रशासनाला नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. तसेच भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करून येणाऱ्या वर्षात मे महिन्याच्या पूर्वी शुक नदीचा गाळ काढला जाईल. तसेच कोणत्याही सूचना न देता सोडण्यात येणारं नाही. धरणाच पाणी सूचना केल्याशिवाय सोडू नये यासाठी संबंधितांना सूचना केल्या जातील. तसेच बंधाऱ्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या वर्षात ते पूर्ण करून घेऊ असे आश्वासन खारेपाटण वासीयांना खासदार नारायण राणे यांनी दिले.

यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, सूर्यकांत भालेकर,खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव व ग्रामपंचायत सदस्य, धनश्री ढेकणे, मनाली होनाळे, किरण करले, क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार, अमिषा गुरव, जयदीप देसाई,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्राजल कुबल, सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल, राजू वरूनकर, शेखर शिंदे, शेखर कांबळी, उज्वला चिके, अविनाश गाठे, पिंटू सर्पे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Mp narayan rane inspected the flood damage in kharepatan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • kankavali
  • Maharashtra Government
  • MP Narayan Rane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
4

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.