Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘माळीवाडा वेस’च्या वादात खासदार निलेश लंके यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

अहिल्यानगर येथील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेली माळीवाडा वेशीचे जतन करण्याची आग्रही मागणी खासदार निलेश लंकेनी केली आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 08:56 PM
'माळीवाडा वेस'च्या वादात खासदार निलेश लंके यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

'माळीवाडा वेस'च्या वादात खासदार निलेश लंके यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर येथील प्राचीन आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारी माळीवाडा वेस ही केवळ दगडी रचना नसून शहराच्या स्थापनेपासून अँग्लो-मराठा युद्धांपर्यंतचा इतिहास जपणारा एक महत्त्वपूर्ण वारसा ठेवा आहे. या वेशीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, ती पाडणे किंवा स्थलांतरित करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. माळीवाडा वेसचे जतन आणि संवर्धन करण्यात यावे, ती पाडू अथवा स्थलांतरित करू नये, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात लंके यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, माळीवाडा वेसचे ऐतिहासिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. इ.स. 1490 ते 1494 या कालावधीत शहराच्या स्थापनेशी संबंधित असलेली ही रचना निजामशाही काळातील तटबंदीचा अविभाज्य भाग मानली जाते. तसेच, शाहजहानच्या काळातील किल्लेदार सर्जेखान यांनी बांधलेल्या तटबंदीच्या प्रमुख प्रवेशद्वारांपैकी ती एक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Ahilyanagar News: आमदार सत्यजित तांबेना भाजपात घेण्याचा विचार? मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी सुनावले

माळीवाडा वेसला सन 1803 च्या अँग्लो-मराठा युद्धाच्या घटनांशीही ऐतिहासिक संबंध असल्याचे पत्रात म्हटले आहे. शहरातील 11 ऐतिहासिक दरवाज्यांपैकी अजूनही अस्तित्वात असलेल्यांपैकी ही एक महत्त्वाची वेस आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांशी, सामाजिक-सांस्कृतिक परंपरांशी आणि शहराच्या ऐतिहासिक ओळखीशीही या वास्तूचा जवळचा संबंध आहे. 1959 मध्ये येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवण्यात आला होता, तसेच शहरातील पहिल्या एसटी बस सेवेचा प्रारंभबिंदू म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.

संविधानाच्या कलम 49 अंतर्गत संरक्षणाची मागणी

लंके यांनी पत्रात म्हटले आहे की, ही वास्तू भारतीय संविधानाच्या कलम 49 अंतर्गत ऐतिहासिक हितसंबंध म्हणून संरक्षणास पात्र आहे. या कलमानुसार ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे जतन करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यामुळे माळीवाडा वेस पाडणे किंवा स्थलांतरित करण्याऐवजी तिचे जतन, संवर्धन आणि पुनर्संचयितीकरण करणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ASI किंवा वारसा प्राधिकरणाकडून तपासणीची मागणी

या ऐतिहासिक वास्तूची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) किंवा संबंधित वारसा प्राधिकरणामार्फत सखोल तपासणी करण्यात यावी, तसेच तिला अधिकृत वारसा स्थळ म्हणून नोंद देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही खा. लंके यांनी केली आहे. एखाद्या तज्ज्ञ समितीमार्फत या वास्तूच्या ऐतिहासिक महत्त्वाचे मूल्यमापन करून तिच्या जतन आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Vasai News : घरगुती गॅसचा गैरवापर; हॉटेलमधील तिघांवर पुरवठा विभागाची कारवाई

पर्यायी उपाययोजनांचा विचार करण्याची सूचना

शहराचा विकास करताना ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हेरिटेज-स्मार्ट रोड, वाहतूक पुनर्रचना, संरक्षक भिंती, प्रकाशयोजना आणि हेरिटेज कॉरिडॉर यांसारख्या पर्यायी उपाययोजनांचा विचार केला जाऊ शकतो, असेही खा. लंके यांनी पत्रात सुचवले आहे. त्यामुळे माळीवाडा वेस पाडण्याचा किंवा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊ नये आणि याबाबत संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Mp nilesh lanke strong demand to preserve ancient historical heritage of maliwada gate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Nilesh Lanke

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.