Praniti Shinde: "... हे तर दो दिन की चांदनी"; खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणावर केली टीका? वाचा सविस्तर...
सोलापूर: खासदार प्राणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार, महायुती सरकार या विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी भाजप म्हणजे दोन दिन की चांदनी आहे अशी टीका केली आहे. तर ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. खासदार प्राणिती शिंदे नेमके काय म्हणाल्या आहेत, ते जाणून घेऊयात.
खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या,”ज्यांची तत्वे जमिनीशी जोडलेली आहेत, ते कधीच आमचा कॉँग्रेस पक्ष सोडून जाणार नाहीत. काँग्रेस पक्ष हा देशाच्या संविधानासाठी लढलेला पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर झुकले.”
“जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा पाकिस्तान इंदिरा गांधींसमोर सरेंडर झाले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना इंदिराजींचे ऐकावे लागले होते. तर इकडे सगळे उलटे झाल्याचे दिसून आले. इकडे मोठे मोठे बाण सोडतात आणि तिकडे ट्रम्पसमोर नतमस्तक होतात. देशासाठी आपली सेना लढली, त्या सेनेला कमकुवत बनवण्यास नरेंद्र मोदी जबाबदार आहेत,” असे खासदार प्राणिती शिंदे म्हणाल्या.
“भाजप म्हणजे दो दिन की चांदनी आहे.देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कसलाही ताळमेळ नाही. लवकरच महायुतीत बिघाड होणार आहे. लवकरच ती तुटणार आहे. त्या उलट काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही, तो मजबूत अधिक मजबूत आहे,” अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.
‘Operation Sindoor’ वरून पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना खडसावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. कॅनडामध्ये दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. यामध्ये मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून ट्रम्प यांना सुनावले असल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताने कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यात स्वीकारणार देखील नाही, असे मोदी ट्रम्प यांना म्हणाले आहेत.
ऑपरेशन सिंदुरबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची मध्यस्थी आम्ही स्वीकारली नाही आणि भविष्यात कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही असे खडे बोल ट्रम्प यांना सुनावले आहेत. तसेच पाकिस्तानच्या गोळीला भारत गोळ्याने उत्तर देईल असे देखील मोदी म्हणाले आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याचा दावा केला होता. त्यावर पंतप्रधान मोदी बोलले आहेत.