पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना सुनावले (फोटो -सोशल मीडिया)
PM Narendra Modi- Donald Trump: भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ पेक्षा जास्त दहशतवादी अड्डे उध्वस्त केले होते. भारताने पाकिस्तानची दाणादाण उडवली होती. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने भारतने पाकिस्तानविरुद्ध सैन्य कारवाई थांबवली असा दावा ट्रम्प यांनी केला होता. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या दाव्यात आज ट्रम्प यांना सुनावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. कॅनडामध्ये दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. यामध्ये मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून ट्रम्प यांना सुनावले असल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताने कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यात स्वीकारणार देखील नाही, असे मोदी ट्रम्प यांना म्हणाले आहेत.
ऑपरेशन सिंदुरबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची मध्यस्थी आम्ही स्वीकारली नाही आणि भविष्यात कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही असे खडे बोल ट्रम्प यांना सुनावले आहेत. तसेच पाकिस्तानच्या गोळीला भारत गोळ्याने उत्तर देईल असे देखील मोदी म्हणाले आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पंतप्रधान मोदी बोलले आहेत.
भारतीय लष्कराने दिली A टू Z माहिती
पाकिस्तानने शस्त्र म्हणून नागरी विमानांचा वापर केला. कोणत्याही भारतीय हवाई तळाचे नुकसान झाले नाही. पाकिस्तानने श्रीनगरपासून कच्छपर्यंत ड्रोन हल्ले केले. जम्मू, उधमपूर आणि पठाणकोट हवाई तळांवर हल्ला केला. पाकिस्तानने ८ आणि ९ मे रोजी ड्रोन हल्ले केले. मात्र आम्ही तयार होतो, त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. आम्ही लाहोरमधील रडार प्रणाली नष्ट केली. यात ३५-४० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं त्यांनी सांगितलं.
हलाई दलाने ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं.
७ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतात कोणतेही नुकसान झाले नाही, कारण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सक्रिय आणि सतर्क होती. आमच्या हवाई संरक्षण तयारीमुळे पाकिस्तानी हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. आम्ही प्रत्येक संभाव्य धोक्याला वेळीच निष्प्रभ केले. ८ आणि ९ मे रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून भारतीय शहरांकडे ड्रोन, यूएव्ही (मानव रहित हवाई वाहने) आणि यूसीएव्ही (मानव रहित लढाऊ हवाई वाहने) सोडण्यात आली. ७ मे रोजी यूएव्ही पाठवण्यात आले होते, परंतु ८ मे रोजी त्यांची संख्या कमी झाली. परंतु त्यांचा उद्देश पाळत ठेवणे आणि नागरिकांना घाबरवणे हा होता, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिली.