Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Kul on Ring Road: पुण्याच्या वाहतूक कोंडीवरुन राहुल कुल आक्रमक: राज्य सरकारचे मोठे पाऊल

पुणे शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 13, 2026 | 10:52 AM
Pune Traffic, Ring Road, Rahul Kul, Madhuri Misal, Pune Infrastructure, PMRDA,

Pune Traffic, Ring Road, Rahul Kul, Madhuri Misal, Pune Infrastructure, PMRDA,

Follow Us
Follow Us:
  • पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या हालचाली सुरू
  • रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती
  • खडकवासला ते लोणी काळभोर या २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यासाठी सरकारने २२०० कोटी रुपयांची तरतूद
Rahul Kul on Ring Road: पुणे जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर रिंगरोड आणि इलेव्हेटेड रस्त्यांच्या प्रकल्पांना गती देण्याबरोबरच महामार्ग आणि शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी आग्रही मागणी आमदार राहुल कुल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. या मागण्यांची दखल घेत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती देत अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Maharashtra Politics: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा: मंत्रिमंडळानंतर आता विधानसभेची मोहोर? जाणून घ्या काय

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आ. कुल यांनी पुणे महानगर क्षेत्रातील दळणवळण सुलभ करण्यासाठी रिंगरोड आणि उड्डाणपुलांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. हे प्रकल्प पुण्याच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या ‘इनर रिंग रोड’चे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खडकवासला ते लोणी काळभोर या २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याकरिता शासनाने सुमारे २२०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे शहराच्या मध्यभागी सुमारे ३४ किलोमीटरची शासकीय जागा उपलब्ध होणार असून भविष्यातील वाहतूक नियोजनासाठी तिचा वापर करावा, असेही त्यांनी सुचविले.

Tuljapur Devi: काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा, तुळजापूरच्या देवीची अद्भुत कथा जाणून घ्या

पुणे शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिकेने संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमणे कालबद्ध पद्धतीने हटवावीत, अशी मागणी आ. कुल यांनी केली.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिंगरोड प्रकल्पातील १२ पॅकेजेसपैकी ९ पॅकेजेसचे काम सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या १४.१ हेक्टर जागेसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Mp rahul kul pushes for punes infrastructure 2200 crore tunnel project to ease traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Madhuri misal
  • Pune Traffic
  • Rahul Kul
  • Ring Road

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.