फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर हे अत्यंत पवित्र शक्तीपीठ मानले जाते. ही देवी अनेक कुटुंबाची कुलदेवत आहे. तिच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक तुळजापूरला येतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि संकटातून मार्ग दाखवणारी देवी म्हणून तुळजाभवानीचा महिमा खूप मोठा मानला जातो. जाणून घ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा महिमा आणि कथा.
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबासाठी तुळजाभवानी ही कुलस्वामिनी आहे. ही देवता आदीशक्तीचं रुप मानलं जातं. तुळजाभवानीचं मुख्य मंदिर महाराष्ट्रातील तुळजापूर येथे आहे. अनेक भक्त देवीला आई तुळजाभवानी या नावाने ओळखतात. तुळजापूर हे प्राचीन काळापासून शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेले तुळजाभवानीचे मंदिर हजारो वर्षे जुने आहे. मंदिर उताऱ्यावर बांधल्यामुळे भक्तांना देवीचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरून जावं लागतं. मंदिरात असलेली देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून ती अत्यंत सुंदर आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. तुळजाभवानीचे मंदिर दगडी बांधकामाचे आहे. मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे आहेत. दीपमाळा आणि प्राचीन वस्तू देखील येथे पाहायला मिळतात. गर्भगृहात देवीची मूर्ती स्थापित आहे आणि भक्त तिथे जाऊन दर्शन घेतात. तुळजाभवानीच्या मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी असते. विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या काळात लाखो भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
महाराष्ट्राच्या इतिहासातही या देवीला विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुळजाभवानीवरती अपार श्रद्धा होती. शिवाजी महाराजांना साक्षात तुळजाभवानीने स्वप्नात दृष्टांत देऊन भवानी तलवार आणि स्वराज्य स्थापनेला आशीर्वाद दिला असं म्हटलं जातं. तुळजाभवानी कुलस्वामिनीशी निगडित काही पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात.
त्या म्हणजे पूर्वी मधु आणि कैठभ या दैत्यांनी पृथ्वीवर मोठा अत्याचार सुरु केला होता. देवता आणि ऋषी यांना त्यांच्यापासून खूप त्रास झाला होता. दोघांनी आदिशक्तीशी प्रार्थना केली तेव्हा देवीने तुळजाभवानीचे रुप धारण केलं आणि त्या दैत्यांचा पराभव करून पृथ्वीचं रक्षण केलं.
दुसऱ्या कथेनुसार, माथंग नावाच्या राक्षसाने लोकांना खूप त्रास दिला तेव्हा देवीने प्रकट होऊन त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यामुळे लोकांनी या देवीची पूजा सुरू केली आणि त्या ठिकाणी मंदिर उभारले. भक्तांचा असा विश्वास आहे की, तुळजाभवानीची भक्ती केल्याने संकट दूर होतात, धैर्य मिळते आणि जीवनात यश प्राप्ती होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मंदिर दगडी बांधकामाचे असून ते उतारावर बांधलेले आहे. त्यामुळे भक्तांना देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात काळ्या दगडातील देवीची सुंदर मूर्ती स्थापित आहे.
Ans: इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीचे मोठे भक्त होते. परंपरेनुसार देवीने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन भवानी तलवार आणि स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिला असे मानले जाते.
Ans: कथेनुसार मधु आणि कैठभ या दैत्यांनी पृथ्वीवर अत्याचार केला तेव्हा देवीने तुळजाभवानीचे रूप धारण करून त्यांचा पराभव केला. तसेच माथंग नावाच्या राक्षसाचा वध करून लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले.






