सरकार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करण्या संबंधी गंभीर असून कायद्यातील पळवाट थांबण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून ससून रुग्णालयातील गैरसोयींना वाचा फोडली. ससूनमध्ये डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, औषधे उपलब्ध नसतात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
जिल्हा परिषदेच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणात अविवाहित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे.