Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आश्चर्यम् ! पुण्यातून वाहतूक कोंडी, हॉर्नचा कर्कश आवाज गायब; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

दिवाळीच्या सुट्यांमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बाहेरगावाहून पुण्यात नोकरी-व्यवसायासाठी आलेले अनेक नागरिक गावी गेले आहेत. त्यामुळे शहरातील दैनंदिन वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 10, 2026 | 02:52 PM
पुण्यातून वाहतूक कोंडी, हॉर्नचा कर्कश आवाज गायब; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

पुण्यातून वाहतूक कोंडी, हॉर्नचा कर्कश आवाज गायब; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या सुट्यांमुळे पुणे शहरातील वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात ओसरली.
  • प्रमुख चौक, मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर वाहतूक सुरळीत झाली.
  • सिग्नलवरील लांबच लांब रांगा आणि वाहतूक कोंडी कमी झाली.
पुणे : वर्षभर वाहतूक कोंडी, सिग्नलवरील लांबच लांब रांगा आणि वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाने गजबजलेल्या पुणे शहराचे चित्र दिवाळीच्या सुट्यांमध्ये पूर्णपणे बदलले आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवरील वाहनांची गर्दी ओसरल्याने रस्ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांना सध्या अवघ्या काही मिनिटांत इच्छित स्थळी पोहोचता येत आहे. मोकळ्या रस्त्यांवरून विनाअडथळा प्रवास करण्याचा आनंद वाहनचालक घेत आहेत.

दिवाळीच्या सुट्यांमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बाहेरगावाहून पुण्यात नोकरी-व्यवसायासाठी आलेले अनेक नागरिक गावी गेले आहेत. त्यामुळे शहरातील दैनंदिन वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचा परिणाम प्रमुख चौक, मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्गांवरही दिसून येत आहे. नेहमी वाहनांच्या गर्दीने गजबजलेले रस्ते सध्या मोकळे दिसत आहेत. फेरीवाले, दुकानांसमोरील साहित्य आणि अतिक्रमणांमुळे अरुंद झालेल्या काही रस्त्यांवरही सध्या तुलनेने कमी गर्दी जाणवत आहे. सकाळी फिरायला जाणारे नागरिक आणि व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांनाही मोकळ्या रस्त्यांचा अनुभव घेता येत आहे. सिग्नलवर लागणाऱ्या लांब रांगा कमी झाल्याने वाहनचालकांचा वेळ वाचत आहे.

सार्वजनिक वाहतुकीतही गर्दीचे चित्र बदलले आहे. नेहमी प्रवाशांनी भरलेल्या पीएमपीएमएल बस आणि मेट्रोमध्ये सध्या तुलनेने कमी गर्दी दिसत आहे. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी होणारी धावपळ आणि मेट्रो स्थानकांवरील गर्दी कमी झाल्याने प्रवाशांना आरामात प्रवास करता येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही मोकळ्या पुण्याची चर्चा रंगली आहे. ‘पुण्यातील रस्ते वर्षभर असेच मोकळे का राहू शकत नाहीत?’, असा मिश्किल सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दिवाळीच्या सुट्यांनी पुण्याच्या वाहतुकीला काही दिवसांसाठी का होईना, पण मोकळा श्वास दिला आहे.

वर्षभर पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे कुठेही जायचे म्हटले तरी बराच वेळ हातात ठेवावा लागतो. मात्र, दिवाळीच्या सुट्यांमध्ये रस्ते इतके मोकळे झाले आहेत की काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचता येत आहे. शहरातील ही शांतता आणि मोकळे रस्ते पाहून आनंद वाटतो. असेच नियोजन वर्षभर राहिले, तर पुणेकरांचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.

– सदानंद जोशी, पुणेकर नागरिक

FAQ

1. पुण्यातील रस्ते सध्या मोकळे का झाले आहेत?
दिवाळीच्या सुट्यांमुळे आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि बाहेरगावचे अनेक नागरिक पुण्याबाहेर गेल्याने शहरातील वाहनांची वर्दळ कमी झाली आहे.

2. वाहतूक कोंडीवर काय परिणाम झाला?
प्रमुख चौक आणि सिग्नलवरील वाहनांच्या रांगा कमी झाल्याने वाहतूक तुलनेने सुरळीत झाली आहे.

3. पुणेकरांना याचा काय फायदा होत आहे?
वाहनचालकांना कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येत असून विनाअडथळा प्रवास करता येत आहे.

Web Title: Traffic congestion and jarring sound of horns have vanished from pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

Pune: ऐन दिवाळीत पुण्याचा श्वास कोंडला! फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या हवेच्या प्रदूषणाचा AQI थेट…
1

Pune: ऐन दिवाळीत पुण्याचा श्वास कोंडला! फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या हवेच्या प्रदूषणाचा AQI थेट…

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
2

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री
3

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू
4

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.