MP Sanjay Raut gets aggressive after Amit Shah mentions Aurangzeb's tomb
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह हे काल (दि.12) महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांनी रायगडावर भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत कौतुक करत त्यांनी शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवण्याचे देखील प्रतिपादन केले. मात्र यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच महाराजांबाबत आम्हाला अमित शाहांकडून शिकावे लागेल एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही, असा टोला देखील खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यावरुन निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता? त्यांची भूमिका काय होता? महाराष्ट्राने काय काय केलं पाहिजे हे औरंगजेबाने सूडाने कारवाया करणारे आम्हाला ज्ञान देत आहे का? असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे. त्यांच्या आजूबाजूला बसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि जय जय करणारे लोक माना डोलवणार एवढी वाईट वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही, असे म्हणत खासदार राऊत यांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत बोलताना अमित दावा यांनी औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख समाधी केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाचं थडगं उखडून टाकण्याच्या विचारांनी भारावून गेले होते. आम्ही औरंगजेबाचं थडगं किवा कबर म्हणतो, औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छावा चित्रपटाचे शो ठेवले होते. पण आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्या औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख देशाच्या गृहमंत्र्यांनी समोबी असा केला. औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधीचा दर्जा दिला रायगडावरुन छत्रपतींच्या साक्षीने समाधीचा दर्जा दिला यापेक्षा महाराष्ट्रात वाईट काय घडणार? मग इतक्या हाणामाऱ्या, दंगली कशाला घडवल्या औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? त्यामुळे औरंगजेबाविषयी इतकं प्रेम गुजरातव्या नेत्यांना आहे. हिंदुत्वाच्या शत्रूला समाधीचा दर्जा देण्याचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. छत्रपतींचे वंशज हे बाजूला बसलेले होते. त्यांना या सगळ्ळ्या गोष्टींचा त्रास व्हायला हवा होता,” अशी गंभीर टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले. खासदार राऊत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे ढोगी चाहते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना औरंगजेबाची समाधी पा शब्दावर आक्षेप घ्यावासा वाटला नाही. औरंगजेबाची समाधी हा शब्द दुसऱ्या कुणी काढला असता तर वर जे त्रिकुट होतं ना त्यातठ्या दोघांनी थयथयाट केला असता. मात्र अमित शाह यांच्याबाबत मुख्यमंत्री काहीच म्हटलं नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अमित शाह यांचं भाषण नीट ऐका त्यांनी शिवाजी महाराज हा उल्लेखच केला नाही उलट शिवाजी, बालशिवाजी, शिवाजी असं करत महाराजांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपतींचा अपमान करणारे हे कुठले ज्ञानदेव? आमच्या महाराष्ट्रात ज्ञानदेव आहेत, शिवाजी महाराजांचा अपमान गृहमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी खटला दाखल केला पाहिजे. एसंशी वाले नकली हिंदुत्व सांगणारे फालतू लोक कुठे आहेत?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.