mp sanjay raut gives replies to neelam gorhe maharashtra political news
मुंबई – राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. तर यावरुन राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये शिवसेना ठाकरे गटाबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन आता खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांचा एकेरी उल्लेख देखील केला. खासदार राऊत म्हणाले की, “ही विश्वासघातकी अन् निर्लज्जबाई. उद्धव ठाकरे यांना काय कमी केलं तिला द्यायला. हक्कभंग या असल्या धमक्या मला देऊ नका. आम्ही तुरुंगवास भोगून आलो आहोत. नीलम गोऱ्हे यांचं कर्तृत्व काय होतं? मला आठवत आहे बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली तुम्ही पक्षांमध्ये, कुठलं ध्यान आणलं आहे पक्षात आपल्याला शिव्या घालणारं. काही लोकांच्या मर्जी खातिर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून दिल्या,” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राऊत म्हणाले की, “काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना बोलत होत्या की, मी महामंडळाला 50 लाख दिले आहेत. मी उषा तांबे यांना पैसे दिले असल्याचे बोलल्या आहेत. लोकांनी हे रेकॉर्ड केलं आहे. जर ती मर्सिडीज देते असं ही म्हणते तर ती 50 लाख देऊ शकते. लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात ते विचारा. लक्षवेधी लावायला आणि प्रश्न विचारल्या, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करायला किती पैसे घेतात याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. पुराव्यासह आहे. नीलम गोऱ्हे यांचे कालचं वक्तव्य हे विकृती आहे. ते मातोश्रीवर असा आरोप कसा लावू शकतात” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मराठी साहित्य संमेलनावर देखील निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “राज्यातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी साहित्य संमेलन भरवलं आहे का? मराठी मंडळी खंडणी घेऊन साहित्य संमेलन भरवत आहेत. साहित्य मंडळाने याची माफी मागितली पाहिजे. उषा तांबे यांनी हा कार्यक्रम भरवला. हे दुकानदार आहेत. जी राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी जेष्ठ नेते शरद पवार सुद्धा नाकारु शकत नाहीत,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार हे जेष्ठ आहेत. शरद पवार हे साहित्य संमेलनाचे पालक आणि स्वागताध्यक्ष आहेत. ज्या प्रकारचे कार्यक्रम दिल्लीमध्ये ठरवण्यात आले. यामध्ये राजकीय चिखलफेक झाली. यासाठी ते देखील तेवढेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी यांच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. शरद पवार यांनी देखील निषेध व्यक्त केला पाहिजे. शरद पवार गप्प कसे काय राहू शकतात? तुमच्यावर चिखलफेक करतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. ही कोण बाई आहे नीलम गोऱ्हे? हे कोणतं भूत आहे जे साहित्य संमेलनामध्ये जाऊन बसलं आहे. गरळ ओकत आहे. मराठी साहित्याचं नुकसान या लोकांमुळे झालं आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.