पालिकेच्या 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी (File Photo : Student)
मुंबई : नवे शैक्षणिक वर्ष एप्रिल की जून महिन्यात सुरु होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. त्यात आता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळाही सीबीएसईच्या धर्तीवर एक एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. ज्यामुळे शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्यात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार आहे.
हेदेखील वाचा : Pune News: आधी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च अन् पुन्हा ‘या’ कारणासाठी करणार खोदाई; पालिकेचे नेमके चाललंय तरी काय?
राज्यात फक्त नव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. या अभ्यासक्रमाची आखणी सीबीएसईच्या धर्तीवर केली असून, हा बदल वगळता काहीही बदल झाला नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा अभ्यासक्रम 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तयार करण्यात आला आहे. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर शिक्षक, शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालक यांचा गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच (२०२५-२६) करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असून, या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. याकरिता सर्व शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी जिल्हा, तालुकास्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले आहे, अशी माहितीही राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली होती. मात्र, आता यावर अंतिम माहिती समोर आली आहे.
सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना
शैक्षणिक, गुणवत्ता सुधारण्याकरिता शिक्षण विभागाने सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीने केंद्रीय शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती. त्यानुसार सीबीएसई बोर्ड न घेता फक्त थोड्या फार प्रमाणात अभ्यासक्रम स्वीकारण्यात आला आहे. यावर्षी पहिलीची पुस्तके सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने बदल केले जातील, असेही राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Purandar Airport: “विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना रिंग रोड प्रमाणेच…”; आमदार विजय शिवतारेंनी व्यक्त केला विश्वास