Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई…”; साहित्य संमेलनामधून नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? वाचा सविस्तर

दिल्ली येथील तालकटोरा येथे चालू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छ. संभाजी महाराज विचार पिठावरील खुल्या काव्य संमेलनात साहित्यिकांशी यावेळी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2025 | 10:20 PM
Supriya Sule: "राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई..."; साहित्य संमेलनामधून नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? वाचा सविस्तर

Supriya Sule: "राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई..."; साहित्य संमेलनामधून नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: ” राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे. सशक्त लोकशाही मध्ये मनभेद असता कामा नयेत मात्र मतभेद असलेच पाहिजेत. समाजहिताच्या धोरणासाठी विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. आणि विरोधकांच्या टीकेवर आत्मचिंतन करून राज्यकर्त्यांनी कार्य प्रक्रिया सुधारली पाहिजे.” असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. दिल्ली येथील तालकटोरा येथे चालू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छ. संभाजी महाराज विचार पिठावरील खुल्या काव्य संमेलनात साहित्यिकांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुल्या कवी संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शरद गोरे, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मोळक, कवी संमेलन अध्यक्ष युवराज नळे, युवा कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे, महिला व बालविकासच्या प्रशासकीय अधिकारी सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” सशक्त लोकशाही मध्ये टीका झालीच पाहिजे. ती सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने व्हायला हवी. यामध्ये कविता फार मोठ योगदान देते. कवितेच्या माध्यमातून सरकारला जाग आणता येते. कविता प्रभावी शस्त्र असते. कवीने विद्रोह करावा.”

डॉ. शरद गोरे म्हणाले,” या खुल्या साहित्य संमेलनातून कष्टकरी साहित्यिक आपली जगण्याची परिभाषा मांडत आहेत. कष्टकऱ्यांच साहित्य हे खऱ्या अर्थाने व्यवस्थेला जाग करण्याचं काम करते. या खुल्या कवी संमेलनातून कवी आपली व्यथा मांडत आहेत आणि मराठी साहित्यासाठी हे चित्र फारच आश्वासक आहे.” कवी संमेलन अध्यक्ष युवराज नळे म्हणाले, “संजय नहार आणि शरद गोरे यांच्या माध्यमातून राज्यातील व राज्याबाहेरील शेकडो कवी व कवयित्रींना आपल्या कविता, गझल सादरीकरण करण्याची संधी मिळाली. सर्वांनीच अत्यंत सुंदर विचार समाजाला दिला. साहित्यिक उपेक्षित राहता कामा नये, याची आपण नोंद घ्यायला हवी.”

विक्रम मालन आप्पासो शिंदे म्हणाले,” युवा कवींनी विद्रोही साहित्य जन्माला घालावे. गोडी गुलाबाची कविता कष्टकरी कवीची ओळख सांगत नाही. समाजातील समस्यांचे निरीक्षण करून व्यवस्था सुधारण्याची कविता लिहावी. कवी हाच जग बदलण्याचा विचार देऊ शकतो.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल कुंभार यांनी केले. रमेश रेडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Sharad Pawar : राजकारणी साहित्य संमेलनात कशासाठी येतात? शरद पवारांनी थेट सांगितलं

राजकारणी साहित्य संमेलनात कशासाठी येतात? शरद पवारांनी थेट सांगितलं

साहित्यिक आणि राजकारणी यांचे एक अतुट नाते आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा उल्लेख नेहमीच होत असतो. शिवाय राजकारण्याचा साहित्य संमेलनाशी संबंध काय असा प्रश्नही यानिमित्ताने नेहमीच विचारला गेला आहे. त्यावरून वाद ही झाले आहेत. मात्र या वादावरून 98 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पडदा उठवला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटना वेळी शरद पवारांनी याबाबत भाष्यकरत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

 

Web Title: Mp supriya sule said there must be a battle between politicians and writers 98th akhil bhartiy marathi sahitya samelan delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 10:20 PM

Topics:  

  • Delhi news
  • MP Supriya Sule
  • supriya sule

संबंधित बातम्या

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;
1

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;

Rekha Gupta News: हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा..; नेमकं झालं काय?
2

Rekha Gupta News: हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा..; नेमकं झालं काय?

Gordon Ramsay India Debut : प्रसिद्ध मिशेलिन-स्टार शेफ गॉर्डन रॅमसे यांनी भारतात उघडले पहिले रेस्टॉरंट; एकदा पहाच झलक
3

Gordon Ramsay India Debut : प्रसिद्ध मिशेलिन-स्टार शेफ गॉर्डन रॅमसे यांनी भारतात उघडले पहिले रेस्टॉरंट; एकदा पहाच झलक

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश
4

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.