Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवाजीनगर ST बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; स्वारगेट डेपोचे सुद्धा रुपडे पालटणार

पुण्यामध्ये मेट्रोचे काम सुरु झाल्यामुळे महत्त्वाच्या बस स्थानकांचे काही काळासाठी स्थलांतर करण्यात आले होते. मात्र दोन्ही विभागांमध्ये मतभेद झाल्यामुळे काम रखडले होते. हे काम पूर्ववत करण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2025 | 12:54 PM
MSRTC and Mahametro sign agreement for improvement of Swargate and Shivajinagar bus depots

MSRTC and Mahametro sign agreement for improvement of Swargate and Shivajinagar bus depots

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यामध्ये महत्त्वाचे बस स्थानक असलेल्या शिवाजीनगर येथे मेट्रोचे काम सुरु झाले होते. मात्र बस स्थानक आणि मेट्रो प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो)मध्ये बसस्थानच्या पुनर्बांधणीवरुन मतभेद झाले होते. मात्र यामुळे काम रखडले गेले आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत आता पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करुन मार्ग काढला आहे.

शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी पुण्यातील खासदार, आमदारांसह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  मेट्रो आणि बस दोन्ही विभागांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले आहे. शिवाजीनगर येथील जुन्या एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. , या प्रकल्पासाठी ‘एमएसआरटीसी’ आणि महामेट्रो यांच्यात येत्या आठवडाभरात करार करण्यात येणार आहे. ६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन मे महिन्यात होणार असून, तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. त्यामुळे शिवाजीनगरच्या बस स्थानकच्या पुर्नंबांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवाजीनगर (पुणे)एस .टी बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट बस डे पो व मेट्रो स्थानक विकसित करणार करण्यात येणार आहे. याबाबत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  शिवाजीनगर येथील बस स्थानक विकसित करण्यासाठी महा मेट्रो व राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. याच त्या अनुषंगाने हे बस स्थानक विकसित होत आहे याच धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक ही विकसित करावे अशा सुचना राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केल्या याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले

बाधा, वापरा, हस्तांतरण करा यानुसार शिवाजीनगर (पुणे) बसस्थानक विकसित करण्यात आले आहे याच अनुषंगाने आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी हे काम तात्काळ पुर्ण करण्याबाबत सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले . या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नवि विभाग अ.मु.स. असिम गुप्ता ,पुणे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर तसेच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर हे उपस्थित होते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या बैठकीमध्ये राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी शिवाजीनगर बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत सूचना केल्या त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्वतः मान्यता दिली व संबंधितांना आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले ज्याप्रमाणे शिवाजीनगर येथील बस स्थानकात दोन तळघर चारचाकी वाहन बस स्थानकाचा तळमजला व व्यावसायिक साठी शॉपिंग मॉल आहेत त्याचप्रमाणे स्वारगेट येथील बस स्थानकात अशा प्रकारच्या सुविधा असाव्यात अशा सूचना यावेळी राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले पुणे महा मेट्रो व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दोघांच्या समन्वयातून ही सुंदर व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत लवकरच उभी राहील अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

Web Title: Msrtc and mahametro sign agreement for improvement of swargate and shivajinagar bus depots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
1

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार
2

पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
3

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
4

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.