Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट मॅच बघत बस चालवणाऱ्या चालकाला एसटी महामंडळाने केले बडतर्फ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात, एसटी चालक चक्क मॅच बघत बस चालवत आहे. आता या चालकावर कारवाई झाली असून त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 23, 2025 | 05:47 PM
क्रिकेट मॅच बघत बस चालवत असणाऱ्या चालकाला एसटी महामंडळाने केले बडतर्फ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

क्रिकेट मॅच बघत बस चालवत असणाऱ्या चालकाला एसटी महामंडळाने केले बडतर्फ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक एसटी चालक मॅच बघत बस चालवत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर, अनेकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त केली होती. या घटनेची गंभीरता लक्षात घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या चालकावर कारवाई केली असल्याची माहिती दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले असून संबंधित खाजगी कंपनीला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे.

वळसे पाटलांच्या भीमाशंकर साखर कारखान्याचा डंका वाजला; देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार जाहीर

21 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला ५०००/- इतका दंड ठोठावला आहे.

Devendra Fadnavis News: वाघांच्या हल्ल्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना; फडणवीसांचे पालकमंत्र्यांना निर्देश

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. ” अपघातविरहित सेवा ” हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल! तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

खाजगी अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचे चालक देखील कानात हेडफोन घालून गाडी चालवत मोबाईलवर मॅच अथवा चित्रपट पाहत असल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गाकडून येत आहेत. या संदर्भात लवकरच परिवहन विभागाकडून नवीन नियमावली निश्चित करून अशा चालकांच्यावर निर्बंध आणले जातील.” असे देखील प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: Msrtc has taken action against bus driver for watching cricket match says transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • auto news
  • MSRTC Workers
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?
1

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
2

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
3

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
4

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.