Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांचा सर्वात मोठा महोत्सव; मुंबई फेस्टिवल 2024 ची आजपासून जल्लोषात सुरुवात

मुंबईच्या क्रॉस मैदान गार्डन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुंबई फेस्टिवल 2024 चे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई फेस्टिवल संस्कृती, सिनेमा, संगीत, मनोरंजन, चित्रपट आणि स्टार्टअप चॅलेंजेस, खेळ आणि खरेदी यांचा एक अनोखा संगम ठरतो आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2024 | 12:55 PM
मुंबईकरांचा सर्वात मोठा महोत्सव; मुंबई फेस्टिवल 2024 ची आजपासून जल्लोषात सुरुवात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई हे शहर  (Mumbai City) विविधतेने नटलेल्या संस्कृतींना एकत्र जपणारे असून सर्वसमावेशक असे आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मुंबई फेस्टिवलचे (Mumbai Festival) आयोजन करण्यात येते. मुंबईची संस्कृती आणि विविधता जपणारा लोकांचा हा हक्काचा उत्सव आजपासून सुरू होत असून याचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबईच्या क्रॉस मैदान गार्डन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते मुंबई फेस्टिवल 2024 (Mumbai Festival 2024) चे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई फेस्टिवल संस्कृती, सिनेमा, संगीत, मनोरंजन, चित्रपट आणि स्टार्टअप चॅलेंजेस, खेळ आणि खरेदी यांचा एक अनोखा संगम ठरतो आहे.

मुंबईतील बहुप्रतिक्षित सोहळ्यांपैकी एक असणाऱ्या मुंबई फेस्टिवल 2024 विविधतेने नटलेल्या समाजांना एकत्र आणण्यासाठी आणि या शहराचा अजरामर वारसा पुढे चालवण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. मुंबईच्या अलौकिक सांस्कृतिक वारसाचे वर्णन करत अनोख्या सांस्कृतिक कलाकृतीचा पाया या फेस्टिवलने रचला आहे. 20 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणारा मुंबई फेस्टिवल 2024 हा मुंबईच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंबच असेल. क्रॉस मैदान येथे होणाऱ्या या फेस्टिवलच्या नेत्रदीपक उद्घाटन समारंभामध्ये कला क्षेत्रातील दिग्गज लोक उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यामध्ये काय असणार खास

उद्घाटन सोहळ्यावेळी स्टार कलाकार सारा अली खान, अनुपम खेर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, अमेय वाघ आणि मिनी माथूर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अशोक हांडे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे नेत्रदीपक सादरीकरण करणार आहेत.  नृत्यग्रामचे सादरीकरण व प्रसिद्ध कथक आणि लावणी विशेषज्ञ अदिती भागवत आणि धारावी ड्रीम प्रोजेक्टच्या मुलांसह तबला वादक मास्टर अनुराधा पाल यांचे अनोखे सादरीकरण याचा समावेश आहे. तसेच उद्घाटन समारंभाच्या परफॉर्मन्समध्ये प्रतिभावान गायक डॉ. तुषार गुहा यांचे स्वागतगीत, श्रद्धा विद्यालय तर्फे एक उत्साही लेझीम सादरीकरण आणि शर्वरी जेमिनिस यांच्या कथ्थक नृत्याचा देखील समावेश असणार आहे.

सर्वांना घेता येणार ‘अस्सल मुंबई’चा अनुभव

सर्वांना ‘अस्सल मुंबई’चा अनुभव घेता यावा यासाठी, मुंबई फेस्टिवल बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर महा मुंबई एक्स्पोचे आयोजन करत आहे. यामध्ये विशेष खाद्यपदार्थांची मेजवानी – ‘टेस्ट ऑफ मुंबई’, गेम झोन थ्रिल, दुर्मिळ उत्पादने, हस्तकला, ​​फ्ली मार्केटसारख्या अनुभवांचा समावेश आहे. इतकेच नाही तर, यात अनेक बक्षिसे समाविष्ट आहेत जी दररोज दिली जातील, लोकसंगीत आणि लोकप्रिय संगीत, नृत्य, कॉमेडी, मास्टर शेफद्वारे लाइव्ह कुकिंग आणि रिटेल थेरपीसाठी रिटेल संधी, कार्यशाळा आणि मुलांसाठी गेम्स देखील उपलब्ध असणार आहे.

खाद्य संस्कृती येणार चाखता

भेळपुरी, पाणीपुरी, गोळा, कुल्फी आणि आईस्क्रीम विकणारे स्टॉल्स असणार आहेत. तसेच  मासळी आणि चिकन-मटण थाळीच्या विविध चवी चाखता येणार आहेत. सिचुआन स्पाइसच्या अनोख्या मुंबई-शैलीतील इंडो-चायनीज पाककृतीचा आस्वाद घेता येणार आहे. मुंबई फेस्टिवल २०२४ मध्ये जिटीसीद्वारे “टेस्ट ऑफ मुंबई” नावाने प्रचलित २० पेक्षा जास्त खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खाद्य संस्कृती चाखता येणार आहे.

 

Web Title: Mumbai festival 2024 inaugurated by cm shinde and dcm fadnavis in cross maidan garden nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadnavis
  • girish mahajan
  • Mumbai City
  • Mumbai Festival

संबंधित बातम्या

Girish Mahajan : “मी काही खिशात पैसे घेऊन आलेलो नाही..; पूरग्रस्तांनी मदतीची मागणी करताच गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत
1

Girish Mahajan : “मी काही खिशात पैसे घेऊन आलेलो नाही..; पूरग्रस्तांनी मदतीची मागणी करताच गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत

Girish Mahajan News: जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना पक्षात घ्या, त्रास कमी होईल; गिरीश महाजनांचे सूचक विधान
2

Girish Mahajan News: जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना पक्षात घ्या, त्रास कमी होईल; गिरीश महाजनांचे सूचक विधान

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव
3

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन
4

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.