Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई गोवा महामार्ग प्रकरण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही ट्रॉमा सेंटर नाही ; याचिकाकर्त्यांनी दिली उच्च न्यायालयाला माहिती

वेळीच उपचार न मिळाल्याने तसेच एमजीएम रुग्णालयापर्यंतच्या प्रवासादरम्यान अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे रायगड ते सिंधुदुर्ग ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मेंदूरोगतज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञ यांची नियुक्ती करण्याची मागणीही याचिकाकर्त्यानी केली. त्यावर हा मुद्दा आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 08, 2023 | 09:48 PM
mumbai goa highway case raigad ratnagiri sindhudurg districts have no trauma center the petitioners informed the high court nrvb

mumbai goa highway case raigad ratnagiri sindhudurg districts have no trauma center the petitioners informed the high court nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके , मुंबई : मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या तीन महत्वाच्या जिल्ह्यातून जातो. मात्र, या तीनही जिल्ह्यामध्ये एकही ट्रॉमा सेंटर (Trauma Center) नसल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना थेट नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल लागत असल्याचेही न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावे आणि अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळतील यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करावे अशी सूचना केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या (एनएच-६६) चौपदीकरणाचे आणि मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर मुळचे कोकणातील असलेले ॲड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तीन जिल्हे आहेत. मात्र या पट्ट्यात एकही ट्रॉमा केअर सेंटर नसल्याने अपघातग्रस्तांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात आणावे लागते.

वेळीच उपचार न मिळाल्याने तसेच एमजीएम रुग्णालयापर्यंतच्या प्रवासादरम्यान अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे रायगड ते सिंधुदुर्ग ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मेंदूरोगतज्ज्ञ आणि हृदयरोगतज्ज्ञ यांची नियुक्ती करण्याची मागणीही याचिकाकर्त्यानी केली. त्यावर हा मुद्दा आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. तर महाड येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू केल्याचा दावा राज्य सरकारने केला. मात्र राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रात या सेंटरसाठी तूर्त पत्रव्यवहार सुरू असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयानेही त्याची दखल घेऊन तसेच अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळण्याकरिता सरकारने या प्रकरणी लक्ष घालावे आणि तातडीने प्रयत्न करावे असे आदेशही दिले.

न्यायालयाने आणखी किती देखरेख ठेवायची

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. तर पनवेल ते इंदापूर या पट्ट्यातील काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा, या प्रकरणी न्यायालयाने आणखी कितीकाळ देखरेख ठेवायची ? अशी विचारणा खंडपीठाने केली. त्याला महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली. त्याची दखल घेऊन मार्चपर्यंत किती खड्डे भरण्यात आले त्याची माहिती सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देऊन खंडपीठाने सुनावणी १२ एप्रिलपर्यंत तहकूब केली.

Web Title: Mumbai goa highway case raigad ratnagiri sindhudurg districts have no trauma center the petitioners informed the high court nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2023 | 09:48 PM

Topics:  

  • High court
  • रायगड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.