Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local : प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या; तांत्रिक कामासाठी रविवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक

रेल्वेच्या काही तांत्रिक बाबी दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मार्गांवर असलेल्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक रेल्वेप्रशासनाने जारी केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2025 | 01:37 PM
Mumbai Local : प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या; तांत्रिक कामासाठी रविवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक

Mumbai Local : प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या; तांत्रिक कामासाठी रविवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वेच्या काही तांत्रिक बाबी दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. लोकलचे सिग्नल दुरुस्ती, तसंच रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम देखील करण्यात येणार आहे. यामुळे प्रवााश्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मार्गांवर असलेल्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक रेल्वेप्रशासनाकडून जारी करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वे मेगा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड

मध्य रेल्वे मेगा ब्लॉक अपडेट सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड येथे अप आणि डाउन धीम्या मार्गावर लोकल धावतील . सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन स्लो मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरुन वळवल्या जाणार आहेत. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाउन स्लो मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या दरम्यान लोककच्या फेऱ्या नियोजित वेळेपेक्षा उशीराने होणार आहेत. १५ मिनिटे उशिराने गाड्या धावणार आहेत.

सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबतील आणि माटुंगा स्थानकावर धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ट्रान्स-हार्बर मेगा ब्लॉक अपडेट

ट्रान्स-हार्बर लाईन मेगा ब्लॉक अपडेट सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान यूपी आणि डीएन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक अपडेट सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठीच्या डीएन लाईन सेवा आणि सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत पनवेल/नेरुळ/वाशीहून सुटणाऱ्या ठाण्यासाठीच्या अप लाईन सेवा रद्द राहतील.

पश्चिम लोकल मेगा ब्लॉक अपडेट

अप आणि डाउन जलद वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५  पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.   अप-डाउन जलद मार्गावरील लोकल अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. मात्र  राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द केल्या आहेत. त्यामुळे  लोकलच्या फेऱ्या या नियोजित वेळेच्या उशीराने होणार आहे.  मात्र  रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.

Web Title: Mumbai local passengers please pay attention mega block on western and central railway lines on sunday for technical work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • Mega Block Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
1

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
2

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?
3

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

Mumbai Rains Local Train Updates : मुंबईत पावसाचा हाहा:कार; मध्य आणि हार्बरची लोकल सेवा ठप्प
4

Mumbai Rains Local Train Updates : मुंबईत पावसाचा हाहा:कार; मध्य आणि हार्बरची लोकल सेवा ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.