Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro TOD Policy : मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिसरात अधिक घनतेच्या विकासाला प्रोत्साहन;अश्विनी भिडे यांची माहिती

Mumbai Metro TOD Policy : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मेट्रो स्थानकांच्या परिसरात नियोजनबद्ध विकास करण्यावर भर दिला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 24, 2026 | 09:38 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • नागपूर आणि पुणे येथे धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात 
  • नियोजनबद्ध विकास करण्यास प्रोत्साहन दिले जाते  
  •  मेट्रो प्रवाशांची संख्या वाढू शकते  
Mumbai Metro TOD Policy :  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि शहरी विकास यांचा समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे असून, मेट्रो स्थानकांच्या परिसरात नियोजनबद्ध विकास केल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास आणि शहरी वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते, असे प्रतिपादन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले. भुवनेश्वर येथे आयोजित १९व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्समध्ये ‘शहरांच्या हद्दीपलीकडील जमीन वापर आणि वाहतूक’ या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

नागपूर आणि पुणे येथे धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात

महाराष्ट्रातील परिवहनाभिमुख विकासाच्या (Transit-Oriented Development – TOD) उपक्रमांचा उल्लेख करताना श्रीमती भिडे यांनी सांगितले की, नागपूर आणि पुणे येथे या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईमध्येही भूमिगत मेट्रो स्थानकांच्या सुमारे ५०० मीटर परिसरात अधिक घनतेच्या विकासाला प्रोत्साहन देणारे धोरण लागू करण्यात आले आहे.

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

नियोजनबद्ध विकास करण्यास प्रोत्साहन दिले जाते

या धोरणांतर्गत मेट्रो स्थानकांच्या परिसरात घरे, कार्यालये, दुकाने तसेच दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्यास प्रोत्साहन दिले जाते. अधिक बांधकाम क्षेत्रफळास परवानगी देताना आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त प्रीमियममधून मिळणारा निधी स्थानिक नागरी सुविधा आणि वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जातो. त्यामुळे शहरांचा विकास अधिक नियोजनबद्ध आणि एकात्मिक पद्धतीने करण्यास मदत होते.

 मेट्रो प्रवाशांची संख्या वाढू शकते

मेट्रो स्थानकांच्या परिसरातील अशा विकासामुळे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढू शकते, दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकतो आणि मुंबईच्या दीर्घकालीन आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

वाहतूक नियोजन आणि शहरांच्या हद्दीपलीकडील प्रदेशांचा विकास प्रभावीपणे साधण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचेही श्रीमती भिडे यांनी अधोरेखित केले. लंडन आणि सिंगापूरसारख्या शहरांमधील अनुभव तसेच तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारे भविष्यातील शहरी वाहतूकविषयक धोरणे अधिक प्रभावीपणे आखता येतील, असेही त्यांनी सांगितले.

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Web Title: Mumbai metro tod policy ashwini bhide urban development sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • BMC Mayor
  • Mumbai Metro

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.