महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी भांडुप येथील अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र आणि जीएमएलआरच्या बोगद्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. अतिरिक्त मनुष्यबळ, सर्व यंत्रणा वेगाने कामाला लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले…
मुंबईतील रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये नागरिकांना सकारात्मक बदल दिसेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उत्तरदायित्वाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींसाठी पालिकेने सुरू केलेल्या 'मार्ग' (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हियन्स) या समर्पित ॲप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबईत दररोज देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स बसेस आणि अवजड वाहने येतात. या गाड्यांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि मुंबईकरांचा खोळंबा होतो.
महानगरपालिकेच्या शाळांमधील यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुंबईतील दाट वस्ती आणि झोपडपट्टी भागांत कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षण करून 'भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली द्वारे वॉर्ड मॅप तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. राज्यात आयएएस 10 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत दोन नावं होती चर्चेत, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती.
आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यांचे निराकरण वेळेत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
IAS Ashwini Bhide : मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदाचा कार्यभार अधिकारी ब्रिजेश सिंहे यांच्याकडे आहे.
आरे परिसर आणि तेथील झाडे ही मुंबई शहराची फुफ्फुसे मानली जातात. या झाडांचे संरक्षण करणे आणि त्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा असा त्या संदेशामागचा हेतू होता. त्यामुळे संदेशात कोणतीही आक्षेपार्हता अथवा…
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित श्री गणेश गौरव स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड, बृहन्मुंबई…