Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी ते शिवडी यादरम्यान नव्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची घोषणा आहे. हा प्रकल्प आगामी काही वर्षांत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 24, 2025 | 05:30 PM
मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा (फोटो सौजन्य-X)

मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार
  • आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
  • शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा
मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांची कामे आगामी पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईच्या पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण जोडणीला वेग देणार, अनेक महत्त्वाचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे इंडियाज् इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आयआयएमयूएन) आयोजित ‘यूथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सी-लिंकचा वर्सोवा-दहिसर-भाईंदरपर्यंत विस्तार, दहिसरकडील नवीन लिंक रोड, फ्री-फ्लो ब्रिजेस, तसेच विविध टनेल प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या मुंबईतील 60 टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावर असल्याने या क्षेत्राला पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई लोकलचा होणार कायापालट! मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी १० ते १२ लोकल फेऱ्यांची वाढ, हार्बर मार्गावरही एसी लोकल धावणार

बीकेसी ते इतर भागांना जोडणारे बोगदे, नवीन लिंक रोड नेटवर्क, ओव्हर एक्स्प्रेसवे कनेक्शन आदी प्रकल्पांमुळे शहरातील प्रवासाचा सरासरी वेग मोठ्या प्रमाणात वाढेल. मुंबईत पूर्णत: बोगदे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षात मेट्रोचे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि वापरण्यास सोपी बनेल. ‘मुंबई वन’ हा एकात्मिक मोबिलिटी अ‍ॅप नागरिकांसाठी वन-स्टॉप सोल्युशन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पालकांमध्ये खासगी शाळांविषयी आकर्षण वाढल्याने शासकीय व महानगरपालिका शाळांची संख्या कमी होत आहेत असे चित्र समोर आले. परंतु वास्तवात परिस्थिती बदलत आहे. महानगरपालिकांच्या शाळांना आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत नेण्याचा संकल्प असून मुंबई महानगरपालिकाकडे ती क्षमता आहे. शासकीय शाळांना योग्य प्रशिक्षण, अध्यापन पद्धती आणि पायाभूत सुविधा दिल्यास त्या खासगी शाळापेक्षा सरस ठरतील, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

लोकशाही अधिक सक्षम आणि सर्व समावेशक करण्यासाठी युवांचा सहभाग अत्यावश्यक आहे. आजच्या लोकशाहीत युवा नागरिक फक्त दर्शक नसून स्वतःचे मत असलेले महत्त्वाचे स्टेकहोल्डर्स आहेत. युवांच्या मतांना स्थान दिल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पर्यावरण बदल ही केवळ पुस्तकी चर्चा नसून वास्तवातील मोठी समस्या आहे. आपण हवामान बदलाचा अनुभव घेणारी पहिली पिढी आहोत आणि त्याबद्दल काहीतरी करू शकणारी शेवटची पिढी आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषणाची सर्वात मोठी कारणे असतात, त्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो संपूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. पुढील टप्प्यात सार्वजनिक वाहतुकीला पूर्णपणे शून्य-उत्सर्जनच्या दिशेने नेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे मुंबईचे सांडपाणी थेट समुद्रात सोडले जात होते, मुंबईसारख्या महानगराचा 100 टक्के सीवेज समुद्रात टाकला जाणे योग्य नाही. त्यामुळे नियम तयार करून आता संपूर्ण मुंबईत सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स उभारत आहोत. पुढील वर्षापर्यंत 100 टक्के ट्रीटेड पाणीच समुद्रात सोडले जाईल. त्याचबरोबर धारावीच्या पुनर्विकासात 30 टक्के क्षेत्र पूर्णपणे अनडेव्हलपेबल ठेवले जाणार असून त्यामुळे प्रचंड प्रमाणात ओपन आणि ग्रीन स्पेसेस निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप युतीत तुटणार; रवींद्र चव्हाणांचे सूचक संकेत

Web Title: Mumbai news announcement of a new flyover between sewri worli big relief for mumbaikars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?
1

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
2

dharmendra passed Away : अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; CM फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

HIV in Maharashtra: केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल
3

HIV in Maharashtra: केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल

पहिलं मानधन फक्त 51 रुपये! बॉलीवूडचे He-Man यांनी शिक्षण कुठे घेतले? जाणून घ्या गावातील शाळेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
4

पहिलं मानधन फक्त 51 रुपये! बॉलीवूडचे He-Man यांनी शिक्षण कुठे घेतले? जाणून घ्या गावातील शाळेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.