KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप युतीत तुटणार; रवींद्र चव्हाणांचे सूचक संकेत
भाजपचे ( BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत रविवारी आयोजित कार्यक्रमात या तणावाचे संकेत दिले. रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आपल्या स्वत:च्या ताकदीवर लढण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट केले. सुरू असल्याचे स्पष्ट केले. चव्हाण यांच्या या विधानामुळे कल्याण डोंबिवलीत युतीच्या भविष्यासंदर्भातील गोंधळ अधिकच स्पष्ट झाला आहे, आणि आगामी निवडणूक रणनितीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC Election) आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी कमळ चिन्हावर मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी थेटपणे शिवसेनेशी तूट कळवली नाही. मात्र त्यांच्या बोलण्याचा सूर याकडे स्पष्ट होता की महापालिका निवडणुकीत भाजपचे स्वबळ महत्त्वाचे ठरेल.
चव्हाण म्हणाले, “तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीत विश्वासाने मतदान करता. यावेळेस फक्त एवढी विनंती आहे की, जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा. कामे मार्गी लावण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने महापालिकेत देखील भाजपचे सरकार आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील.”
Breaking: पाकिस्तानात सेनेजवळ बॉम्बचा धमाका, आत्मघातकी हल्ल्याने हादरले पेशावर; हल्लेखोर घुसले
राजकीय वर्तुळात रवींद्र चव्हाणांचे हे वक्तव्य जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. रविवारी त्यांनी डोंबिवलीत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी आणि मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर उपस्थित होते.
चव्हाण यांनी नगरसेवकांच्या कामांवरही मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले, “नगरसेवकाचे काम नगरसेवकांनी करावे ही भावना नेहमी राहिली. विकास निधी देणे माझे काम, परंतु बाकीचे काम नगरसेवकांनी करावे, हे अपेक्षित होते. काही नगरसेवकांकडून तसे काम झाले नाही. परंतु अडचणी काय होत्या हे आम्ही तुम्हाला सांगणे एवढे तुम्ही दूधखुळे नाही.”






