Mumbai Rani Baug: राणीच्या बागेचा होणार कायापालट? पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय
राणीची बाग म्हणजे मुंबईचा अविभाज्य भाग. या राणीच्या बागेशिवाय मुंबईची ओळख अपूर्णच आहे. गेट ऑफ इंडिया, तारापूर मत्सालय याबरोबरच राणीची बाग ही मुंबईच्या पर्यटनाला चालना देणारी आहे. भायखळा मधील वीर जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहायलय म्हणजेच राणीची बाग येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहेे. मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या आढावा घेतला असता तुलनेत या वर्षीत जानेवारीत भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये 64 हजाराची घट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
काय सांगतो आहे अहवाल ?
गेल्य़ा वर्षातील जानेवारीच्या तुलनेत यंदा जानेवारीत येणाऱ्या पर्यटकांमध्ये एकूण 64 हजारांची घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे याचा फटका पर्यटनातून येणाऱ्या उत्पन्नावर बसलेला आहे. सुमारे यंदाच्या जानेवारीत 27 लाख रुपये इतकी उत्पन्नात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एकंदरीतच मुंबईच्या पर्यटनाच्या विकासाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी म्हणजे 2024मधल्या जानेवारी महिन्यात 2 लाख 91 हजार 136 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. त्यामुळे राणी बाग प्रशासनाला एक कोटी 14 लाख 66 हजार 987 रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा 2025च्या जानेवारी महिन्यात 2 लाख 26 हजार 519 पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बाग प्रशासनाला 87 लाख 24 हजार 445 रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राणीच्या बागेत 64 हजार 617 एवढ्या कमी पर्यटकांनी भेटी दिल्या. तसेच, गतवर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यात राणी बाग प्रशासनाला 27 लाख 42 हजार 542 रुपये कमी उत्पन्न मिळाले.
याचपार्श्वभूमीवर पर्यटन विकासाच्या दृष्टीकोनातून पालिकेने राणीच्या बागेचा कायापालट करण्याचे ठरविले आहे. अत्याधुनिक सुविधांनी कामं करण्यासाठी पालिकेने उपाययोजना सुरु करण्याचं ठरवलं आहे. आता या राणीच्या बागेत आधुनिकीकरणाची कामे सुरू आहेत. तसेच, पेंग्विन आणि वाघानंतर राणी बागेचे नवे आकर्षण म्हणून जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह आणि जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार असल्याचं सांगितलं आहे.जेणेकरुन पर्यटनाला चालना मिळावी हा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे.