मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महसूल, जलसंपदा आणि मृद व जलसंधारण विभागांशी संबंधित तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, अभय योजनेला एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठका सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही मोठे निर्णय घेण्यात आले नव्हते. आजच्या बैठकीतही फक्त तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजना व धरण मजबुतीकरणाच्या उर्वरित कामांसाठी 315 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
Akhilesh Yadav : ‘…मला राजीनामा द्यायचा आहे’, अखिलेश यादव यांनी संसदेत असं का म्हणाले?
कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधाऱ्यांसाठी निधी
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कोयना जलाशयात 25 बुडीत बंधारे बांधण्याच्या प्रकल्पासाठी 170 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली.
शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक कारणांसाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय जमिनींच्या (भोगवटादार वर्ग-2) वर्ग-1 मध्ये रुपांतरासाठी लागू असलेल्या अभय योजनेस एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यामुळे शासकीय जमिनींच्या हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळेल.
Phalodi Satta Bazar: पुन्हा CM होण्याचे केजरीवालांचे स्वप्न भंगणार? आप अन् भाजपला
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हजर होते, परंतु शिंदेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. नव्या सरकारमध्ये पहिले खातेवाटपावर वाद झाला होता आणि आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरूनही वाद दिसत आहेत. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी गेले होते आणि त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीला शिंदे गैरहजर राहिल्याने त्यांच्या नाराजगीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. यावर शिंदेंच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की, वैयक्तिक कारणांमुळे ते बैठकीला गैरहजर होते. ते रूटीन चेकअपसाठी ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात गेले होते, असं सांगण्यात आले आहे.