जलविहाराचा आनंद घेण्यासाठी जात असतानाच दुर्घटना; समुद्रात बोटच बुडाली
आज सर्वत्र गटारीचा उत्साह सुरु आहे. सगळीकडे मटण आणि मासे खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. श्रावण सुरु होणार असल्याने सर्वचजण गटारी साजरी करण्यासाठी नॉन व्हेज पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. मात्र हा उत्साह सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गटारीची पार्टी करण्यासाठी गेलेले 5 जण नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील तानसा नदी क्षेत्रात ही घटना घडली आहे. यातील तिघांना वाचवण्यात यश आलं आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. एकाचा शोध सुरु आहे.
हेदेखील वाचा- नाशिककरांना मोठा दिलासा! गंगापूर धरणातून अखेर पाण्याचा विसर्ग सुरु
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहापूर तालुक्यातील तानसा नदी क्षेत्रात 5 जण गटारीची पार्टी करण्यासाठी गेले होते. हे सर्वजण धरणाच्या 1 नंबर गेटच्या जवळ गाडीमधून बसून पार्टी करत होते. मात्र यावेळी अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला. अचानक पाणी सुरु झाल्याने पाचही जण गाडीसह नदीच्या प्रवाहाच्या दिशेने वाहू लागले. यावेळी त्यातील तिघांना गाडीच्या बाहेर उडी मारली, तर दोन जण गाडीमध्येच अडकले.
हेदेखील वाचा- मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम, शिकविण्याची गरज नाही; विखेंचा थोरातांना टोला
पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने गाडी अगदी काही क्षणातच नदी पात्रात बुडाली. त्यामुळे उर्वरित दोघांना पाण्यातून बाहेर येणं कठीण झालं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु केलं. या शोध कार्यात एकाचा मृतदेह सापडला तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. बेपत्ता तरूणाचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि कल्याण क्षेत्रातील 5 मित्र शहापूर तालुक्यातील तानसा नदी क्षेत्रात गटारीची पार्टी करण्यासाठी गेले होते. हे मित्र धरणाच्या 1 नंबर गेटच्या जवळ गाडीमधून बसून पार्टी करत होते. मात्र यावेळी अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला. पाण्याच्या प्रवाहात चही जण गाडीसह नदीच्या दिशेने वाहू लागले. यावेळी त्यातील तिघांना गाडीच्या बाहेर उडी मारली, तर दोन जण गाडीमध्येच अडकले. बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा तरूण बेपत्ता आहे. दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.
पावसाळ्यात नदी, धरणं, धबधबा अशा ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली जाते. पावसाळ्यात अशा ठिकाणी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. ठाणे आणि मुंबईतसुध्दा पावसाळ्यात धरण, तलाव, नदी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र तरीसुध्दा पर्यटक स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जातात. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. अशा परस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी धरण, तलाव, नदी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना पिकनीकसाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.