Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना

महापालिका अंतर्गत २ हजार १०० गाळेधारक आहेत. या गाळेधारकांना २०१९ ते २०२५ पर्यंतचे गाळे भाडे ५ टक्के दराने भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही काही गाळेधारकांनी भाडे भरलेले नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 06:34 PM
Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना
Follow Us
Follow Us:
  • गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत,
  • भाडेवसुलीसाठी मार्ग काढा;
  • महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना
कोल्हापूर : महापालिका अंतर्गत २ हजार १०० गाळेधारक आहेत. या गाळेधारकांना २०१९ ते २०२५ पर्यंतचे गाळे भाडे ५ टक्के दराने भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही काही गाळेधारकांनी भाडे भरलेले नाही. त्यामुळे ३५ कोटी रुपये गाळे भाडे थकीत आहे. त्यामुळे गाळे भाडे वा व्याजदर भरून घेण्यासाठी वसुली मोहीम राबविण्याच्या सूचना महापौर रुपाराणी निकम यांनी इस्टेट विभागाला दिल्या. याबाबत गय करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
२०१० पासून काही गाळेधारकांनी गाळेभाडे व व्याजही भरलेले नाही-इस्टेट विभागाने गाळे सील केल्यानंतर दहा दिवसात ९५ लाख रुपये भरले आहेत. गतवर्षी सवलत दिली होती. परंतु यंदा सवलत देण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे-

अभय योजनेच्या माध्यमातून गाळेधारकांना व्याजमाफी होऊ शकते. यामध्ये एक महिन्याच्या आत भरले तर ८० टक्के, दोन महिन्याच्या आत भरले तर ५० टक्के, आणि तीन महिन्यांच्या आत भरल्यास ४० टक्के सवलत मिळेल. २०१९-२०२३ लोकांचे कोरोनामध्ये नुकसान झाले. त्यामुळे १२ टक्क्यावरून ८ टक्के व्याजदर केला. त्यानंतर २०२४ ला आलेल्या शासन निर्णयानुसार ५ टक्के व्याजदर आकारला आहे. यापेक्षा खाली येऊ शकत नाही. यावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर म्हणाले, महापौर यांच्या अधिकाराखाली हमीपत्र घेऊन काही करता येते का पाहा. ही रक्कम गाळेधारकांनी भरली तर थकबाकी कमी होईल. यावर चेंबर ऑफ कॉमर्सला पाच टक्केही भाडे व्याजदर मान्य नाही ते दोन टक्के मागतात, असे स्पष्ट केले.

Sangali News : प्रदुषणामुळे नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात

गाळेधारकांकडून वसुली नियमानुसार करा
गाळेधारकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी आपण बोलूया. यातून रेडीरेकनरनुसार नियमितपणे वसुली झाली पाहिजे. एवढी वर्षे तुम्ही वसूली का केली नाही. आता नगरसेवकांवर नाराजी ओढवेल. गाळेभाडे हा महापालिकेचा महत्वाचा आर्थिक स्त्रोत आहे. गेल्या पाच वर्षात पाणीपट्टी, गाळे भाडे सगळीकडे प्रश्न निर्माण झाले. हे त्वरित सोडवले पाहिजेत, अशा सूचना महापौर निकम यांनी दिल्या.

महापालिका उत्पन्नवाढीसाठी मी मदत करीन : रत्नेश शिरोळकर
महापालिकेच्या जागा, गाळे यातून मिळणारे उत्पन्न जमा करण्यासाठी मी मदत करायला तयार आहे, असे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी सांगितले. यावर महापौर निकम यांनी त्यांना परवानगी देत उपाययोजना करण्याचे अधिकार दिले.

खासगी व महापालिका गाळे भाड्याच्या दरात बरीच तफावत
खासगी गळ्याला १० हजार रुपये भाडे, तर महापालिकेच्या गाळ्याना २ ते ३ हजार रुपये भाडे आहे, एक रक्कमी भाडे दिले तर ८० टक्के भाडे भरावे लागते. ५० टक्के मुद्दल भरली तर व्याजदर कमी होईल. २ हजार १०० गाळेधारक आहेत, तर पाच ते सहा कर्मचारी आहेत. यावर महापौर रुपाराणी निकम यांनी आयुक्तांशी चर्चा करून रोजंदारीवर दहा कर्मचारी भरण्याच्या सूचना दिल्या, तसेच अतिक्रमण व परवाना विभागाचे कर्मचारी इस्टेट विभागाने वसुलीसाठी घ्यावेत. यातून गाड्यांची गळती, ड्रेनेज आणि लाईट पाईपलाईनचे प्रश्न सोडवावे. त्यानंतर गाळेधारक आपोआप भाडे व व्याज ही देतील, असा विश्वास महापौर निकम यांनी व्यक्त केला.

Shaktipeeth Highway : महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही; तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

Web Title: Rs 35 crore due to landowners find a way to recover rent mayor ruparani nikam instructs estate department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.