मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कालच (20 ऑक्टोबर) भाजपने आपल्या पहल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर भाजपपाठोपाठ काँग्रेसच्या उमेदवारांसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. काँग्रेसनेही आपल्या 54 उमेदवांची यादी फायनल केली आहे.उद्या 22 ऑक्टोबरला काँग्रेसचीही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीने काँग्रेस उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. पण दुसरीकडे, विदर्भातील 12 जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादही विकोपाला गेला आहे. विदर्भातील आठ जागा ठाकरे गटाला देण्यासाठी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. पण ठाकरे गटाने 12 जागांसाठी आग्रह धरला आहेत. पण विदर्भात काँग्रेसची ताकद जास्त असल्याने काँग्रेससच जास्त जागा लढवणार, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. पण ठाकरे गटही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या. त्यामुळे या जागांसंदर्भात असलेल्या वादावर तोडगा निघाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करेल, अशी शक्यता आहे.
हेही वाचा:ठाकरे- काँग्रेस वाद विकोपाला; शरद पवार काढणार तोडगा
दरम्यान, भरतीय जनता पक्षाने कालच आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली.यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुलए, गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कोणत्याह क्षणी भाजपची दुसरी यादीही जाहीर होऊ शकते, अशी माहिती आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्यल्यानुसार, भाजप 158, शिंदे गट 85 आणि अजित पवार गटाला 45 जागा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या निश्चित उमेदवारांची नावे
साकोली- नाना पटोले
धामणगाव- विरेंद्र जगताप-
तिवसा- यशोमती ठाकूर-
ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार
रिसोड- अमित झनक
उत्तर नागपूर- नितीन राऊत
पश्चिम नागपूर- विकास ठाकरे
देवळी (वर्धा)- रणजित कांबळे
राजूरा ( चंद्रपूर)- सुभाष धोटे
अमरावती शहर- डॉ सुनील देशमुख
अचलपूर- बबलू देशमुख
हेही वाचा:चीनचे हे गाव आजही न सुटलेले कोडेच! अर्ध्या लोकसंख्येची उंची 3 फुटांपेक्षा कमी