Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचारसभेचा रंग चढू लागला आहे. अशातच शनिवारी रात्र नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 04, 2026 | 12:58 PM
Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर
Follow Us
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटला
  • काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
  • पोलिसांच्या समोरचे हा राडा झाला
Bhiwandi Municipal Election: महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटला असून राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वच राजकीय पक्ष भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट- मनसे, अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाच्या निवडणूक प्रचारसभेत पारंपरित प्रतिस्पर्धी काँग्रेसदेखील चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे.

अशातच काल भिंवडीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आणि तिथेच वादाची ठिगणी पडली. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. लाठ्या-काठ्या, हाणामारी झाली, एकमेकांच्या दिशेने खुर्च्यां फेकल्या गेल्या, यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून नारपोली व भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Ram Rahim Singh parole : ही शिक्षा आहे की सहल? राम रहिम पुन्हा ४० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर, हरियाणा सरकारची मंजूरी

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचारसभेचा रंग चढू लागला आहे. अशातच शनिवारी रात्र नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.वादाचे रुपांत हाणामारीत झाले. दोन्ही गटात लाठ्या- काठ्या व दगडांचा मारा झाला, यात दोन कार्यकर्ते जखमीही झाले. नारपोली रस्त्यावर भाजपचे उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय समोरासमोर आहे. शनिवारी रात्री काँग्रेसची प्रचाररॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या दिशेने घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीपर्यंत गेले.

काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेने प्लॅस्टिक खुर्च्या, लाठ्या-काठ्या व दगड भिरकावले. महत्त्वाची बाब म्हणजे, या चौकात बंदोबस्तावर पोलिस तैनात होते. रॅलीतदेखील पोलिस होते. पोलिसांच्या समोरचे हा राडा झाला. याप्रकरणी भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे.

Umrah Tragedy : सौदीत केरळच्या कुटुंबावर काळाचा घाला; उमराह आटोपून परतताना 4 जणांचा भीषण अंत

काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांच्या मुलगी हर्षाली यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर नारपोली आणि भोईवाडा पोलीस ठाण्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून संबंधित पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

 

 

Web Title: Bhiwandi municipal election campaign turns violent clashes between congress and bjp workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Bhiwandi News
  • BJP
  • Congress
  • Municipal Elections News

संबंधित बातम्या

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,
1

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान
2

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
3

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…
4

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.