Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृत्रिम हातांना तंत्रज्ञानाचा सजीव आधार! मुबंईत एमजीएमच्या उपक्रमाला प्रतिसाद, १५ वर्षीय व्यक्तीसाठी बॅटरीवर चालणारा हात

नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात १५ वर्षीय व्यक्तीसाठी बॅटरीवर चालणारा हात तयार करून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या हातांचा वापर करून हात बसवण्यात आलेली व्यक्ती तासनतास काम करू शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2025 | 10:11 AM
कृत्रिम हातांना तंत्रज्ञानाचा सजीव आधार! मुबंईत एमजीएमच्या उपक्रमाला प्रतिसाद

कृत्रिम हातांना तंत्रज्ञानाचा सजीव आधार! मुबंईत एमजीएमच्या उपक्रमाला प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, नीता परब: अपघातात हात-पाय गमवलेल्या तसेच शारीरिक व्यंग असलेल्या दिव्यांगांसाठी विज्ञानाच्या साह्याने कृत्रिम हात-पाय व अन्य अवयव शरीराला जोडले जात असले तरी दिव्यांगांना काहिसा दिलासा मिळतो. पण आता या निर्जीव कृत्रिम अवयवांत प्रगत तंत्रज्ञानातून सजीवपणा आणला जात आहे. सजीव अवयवांप्रमाणेच हे अवयवही हालचाल करणार आहेत. नवी मुंबईच्या कामोठे एमजीएम इन्स्टिट्यूटच्या प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विभागामध्ये सध्या क्लिनिकल ट्रायल उपक्रमाअंतर्गत हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. देशात पहिल्यांदाच पेटंट केलेल्या ग्रिप्पी हॅण्डचे क्लिनिकल मूल्यांकन या विभागाच्या प्रमुख डॉ. उत्तरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे.

लघवीमध्ये दिसून येतात रक्ताच्या गाठी? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, उद्भवेल कॅन्सरचा आजार

निर्जीव अवयवांमध्ये बॅटरीद्वारे सजीवपणा:

भारतात रोबो बायोनिक्सद्वारे तयार केलेला ग्रिपी हा विशेष कृत्रिम हात आहे. एमजीएमच्या एका योजने अंतर्गत तो विनामूल्य दिला जातो. चाचणीद्वारे हात सुरक्षित असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. ग्रिपीला खऱ्या हाताप्रमाणे स्पर्श जाणवतो आणि विविध प्रकारचे ग्रीप करण्यास तो सक्षम आहे. हा हात हलका, वापरण्यास सोपा आहे. ग्रिपीमध्ये स्वतःचे एमएजी सेन्सर्स आहेत. सजीव हाताच्या तुलनेत 60% कमी वेळेत वापरण्याचे कौशल्य यात विकसित करण्यात आले आहे.

ग्रीप्पी हाताची वैशिष्ट्ये:

  • आयआयटीयनच्या स्टार्टअप रोबो बायोनिक्सने ग्रिप्पी नावाचा हा भारतीय बनावटीचा अनोखा बायोनिक कृत्रिम हात तयार केला आहे.
  • या हाताने रुग्ण तासनतास काम करू शकतो. तो हलका व आरामदायी आहे. हाताला स्पर्श करून मऊ किंवा कठीण दैनंदिन गोष्टी अनुभवता येतात.
  • वेगवेगळ्या प्रकारच्या पकडी सजीव हाताप्रमाणे आपोआप करता येतात. रुग्णाला हाताची माहिती 20 मिनिटांत मिळते. 4 ते 5 तास बॅटरीवर चालतो.

अवयव बसविण्याचा विनामूल्य उपक्रम:

नवी मुंबईच्या पनवेल येथील एमजीएम संस्थेच्या प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विभागात ग्रिपी या रोबो बायोनिक्सद्वारे तयार केलेल्या विशेष कृत्रिम हाताचे मागील काही महिन्यांपासून विनामूल्य क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. आजवर 6 रुग्णांवर या हाताचा प्रयोग करण्यात आला असून, यातील चार जणांचा उत्तम प्रतिसाद आहे. अजूनही यात नवनवीन उपक्रम सुरू आहेत. दिव्यांग रुग्णांसाठी संस्थेत विनामूल्य हा उपक्रम राबविला जात आहे.
डॉ. उत्तरा देशमुख, विभाग प्रमुख, एमजीएम

हातापायांना सतत मुंग्या येतात? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम:

एमजीएमच्या विद्यापीठ विभागातील प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विभागात बॅचलर इन प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (बीपीओ) हा 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना तो व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्यांसह कार्यक्षम बनवितो. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना ते आवश्यक सेवा जागतिक स्तरावर पुरवू शकतात. या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे क्लिनिकल इंटर्नशिप, जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लिनिकल सेवेचा अनुभव मिळतो. यात रुग्णांचे मूल्यांकन, प्रीस्क्रिप्शन, मापन, निर्मिती, फिटमेंट आणि तपासणी यांचा समावेश होतो. रुग्णांना आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि समाजासाठी उपयुक्त बनविण्यात ही विद्याशाखा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे विभागप्रमुख डॉ. उत्तरा देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Artificial hands get a living technological foundation battery powered hand for 15 year old in mgm initiative in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Article
  • technology

संबंधित बातम्या

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
1

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.