शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
कॅन्सर हा गंभीर आजार आहे. जगभरात कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहेत. हा आजार झालेली व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जाते. शरीरातील कोणत्या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे निरोगी आरोग्य जगण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी आणि पौष्टिक घटनांचा सेवन करणे आवश्यक आहे. कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात सामान्य लक्षणे दिसू लागतात. मात्र या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार आणखीन गंभीर होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. ज्यामुळे कोणत्याही आजाराचे निदान झाल्यानंतर योग्य वेळी उपचार घेणे सोयीस्कर होते.(फोटो सौजन्य – iStock)
लघवी करताना जळजळ होते? किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर सगळ्यात आधी रक्त चाचणी आणि मूत्र चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण या चाचणीमधून शरीरातील आजाराचे निदान करणे सोपे होते. शरीरात होणाऱ्या आजाराची लक्षणे सगळ्यात आधी लघवीमध्ये दिसून येतात. लघवीमध्ये रक्ताच्या गुठळ्या दिसणे हे कॅन्सरचे लक्षणं असू शकते. त्यामुळे लघवीमध्ये ही लक्षणे दिसल्यास गंभीर प्रकारचा कॅन्सर असण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लघवी रक्त येणे हे कोणत्या कॅन्सरचे लक्षणं आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. मात्र शरीरात कोणत्याही गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर लघवीचा रंग बदलतो. मूत्रपिंडाचा कॅन्सर झाल्यानंतर लघवीवाटे रक्त येऊ लागते किंवा रक्ताच्या गुठळ्या दिसू लागतात. मूत्रपिंडात ट्यूमर तयार होतो तेव्हा मूत्रपिंड आणि मूत्रमार्गामध्ये दाब वाढण्याची शक्यता असते. याचा गंभीर परिणाम मूत्र निर्मितीच्या प्रक्रियेवर होऊन मूत्रमार्गाचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे लघवीमध्ये ही लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घ्यावे.
लघवीमध्ये रक्त येणे हे मूत्राशय कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे. या आजारामध्ये मूत्राशयात अतिरिक्त पेशी तयार होऊ लागतात. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हळूहळू या पेशींचे रूपांतर कर्करोगामध्ये होते आणि लघवीवाटे रक्त येऊ लागत. हा कॅन्सर कोणत्याही वयोगातील व्यक्तीला होऊ शकतो.
प्रोस्टेट कॅन्सर प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळून येतो. यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढू लागतो आणि त्याचे रूपांतर हळूहळू ट्यूमरमध्ये होते. सुरुवातीच्या काळात प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे हे प्रोटेस्ट कॅन्सरचे सामान्य लक्षणं आहे. त्यामुळे पुरुषांच्या शरीरात संबंधित लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तयार झालेल्या गाठी मूत्रमार्गावर दाब निर्माण करतात, ज्यामुळे लघवीवाटे रक्ताच्या गुठळ्या किंवा रक्त येऊ लागते.