शरीरसंबंधित असू शकतात 'या' गंभीर समस्या
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, अवेळी जेवणे इत्यादी अनेक गोष्टी आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. अनेकदा शरीरात हातापायांना अचानक मुंग्या येऊ लागतात. तसेच चिमटा काढल्यासारखी संवेदनशीलता जाणवू लागते. मात्र काही वेळानंतर हातापायांना आलेल्या मुंग्या निघून जातात आणि पुन्हा काही तासानंतर हातापायांना मुंग्या येऊ लागतात. पण ही समस्या सतत उद्भवू लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शरीरात काहीवेळासाठी दिसून येणारी सामान्य लक्षणे पुढे जाऊन मोठ्या आजारानाचे कारण बनतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरातील मज्जातंतूंमध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर शरीरात मुंग्या येऊ लागतात. मज्जातंतूंमध्ये निर्माण झालेल्या समस्या हळूहळू शरीरात देखील दिसू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात नेमक्या कोणत्या कारणामुळे मुंग्या येतात? मुंग्या येणं हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे हातांपायांसह संपूर्ण शरीरात येणाऱ्या मुंग्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
हातापायांमध्ये वारंवार मुंग्या येणं हे मज्जासंस्थेशी संबंधित आजाराचे प्रमुख आणि सामान्य लक्षणं आहे. शरीरात वारंवार येणाऱ्या मुंग्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. मज्जातंतूमध्ये दाब येणे, शरीराला रक्तपुरवठा व्यवस्थित न होणे किंवा मज्जातंतूंची झीज झाल्यानंतर वारंवार हातापायांमध्ये मुंग्या येऊ लागतात. याशिवाय मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास शरीरात मुंग्या येऊ लागतात. रात्री किंवा दिवसा झोपल्यानंतर जास्त वेळ एकाच कुशीवर झोपल्यामुळे हातांपायांमध्ये मुंग्या येतात. यामुळे मज्जातंतूंवर ताण येतो.
मल्टिपल स्क्लेरोसिस, गुइलियन-बॅरे सिंड्रोम इत्यादी मज्जातंतुसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर हातांपायांसह संपूर्ण शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये मुंग्या येऊ लागतात. मज्जातंतुसंबंधित आजार झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. अन्यथा हे आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. मद्यपान आणि धुम्रपानामुळे शरीराच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम दिसून येतो. तसेच शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर हातापायांना मुंग्या येऊ लागतात.
वारंवार अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होते? मग ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करून मिळवा आराम, Acidity होईल कमी
शरीराच्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर हातापायांमध्ये मुंग्या येऊ लागतात. रक्तभिसरण नीट न झाल्यामुळे हातपाय सुन्न पडतात. तसेच शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या किंवा रक्तवाहिन्या आकुंचित झाल्यानंतर मज्जातंतूंना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. तसेच शरीरातील रक्तदाबामध्ये परिणाम झाल्यानंतर रक्तभिसरण बिघडते.