Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! राज्यात आता विहिरी खोदण्यावर बंदी; राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक कापणी प्रयोगांच्या माध्यमातून पारदर्शक आणि अचूक नोंदी ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे योग्य लाभमिळतील आणि कोणताही अन्याय टळेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2026 | 01:27 PM
मोठी बातमी ! राज्यात आता विहिरी खोदण्यावर बंदी; राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मोठी बातमी ! राज्यात आता विहिरी खोदण्यावर बंदी; राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

मुंबई : सप्टेंबर महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाने खंड दिला आहे. परिणामी, राज्यात पिण्याच्या पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत पाण्याच्या स्त्रोतांच्या ५०० मीटर परिसरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी विहिरी खोदण्यास परवानगी देऊ नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर भूजल उपशाचा प्रतिकूल परिणाम होत असल्यास संबंधित विहिरींमधून भूजल उपसा करण्यास काही कालावधीसाठी मनाई करण्याची कार्यवाही करावी. तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपासून एक किलोमीटर अंतरातील विहिरींमधून होणाऱ्या भूजल उपशावर तात्पुरती बंदी आणण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’

दरम्यान, लातूर जिल्ह्यात कमी पावसामुळे पाणीटंचाईची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलस्रोतांचे संरक्षण आणि गळती रोखण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, मांजरा धरणाच्या पाईपलाईनमधून होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांचा एक संयुक्त गट तयार केला जाईल. गळती रोखणे, अवैध पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध संयुक्त कारवाई करणे आणि साठलेल्या पाण्याच्या साठ्याचा वापर करण्याची तयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान

कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक कापणी प्रयोगांच्या माध्यमातून पारदर्शक आणि अचूक नोंदी ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे योग्य लाभमिळतील आणि कोणताही अन्याय टळेल. संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर, पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवावी

दहा पाणीटंचाई निवारणासाठीच्या एकूण उपाययोजनांपैकी टँकरने पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना वगळून उर्वरित नऊ उपाययोजनांना प्रथम प्राधान्य द्यावे. या नऊ उपाययोजना शक्य नसतील, अशा ठिकाणीच टँकर किंवा बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा, टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्याची अट समाविष्ट करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Ganesh Visarjan Traffic : गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Web Title: Ban on digging wells in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Government Decision
  • maharashtra government decision

संबंधित बातम्या

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’
1

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.