Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर

महाराष्ट्र सरकारने लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकच्या वापराबाबत नवी नियमावली लागू केली आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झालेल्या या नियमांनुसार १२ वर्षांखालील मुलांना पालक किंवा मोठ्या व्यक्तीशिवाय लिफ्ट अथवा एस्केलेटरचा वापर करता येणार नाही.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 17, 2026 | 08:54 PM
Maharashtra state government issues new rules regarding use of elevators

Maharashtra state government issues new rules regarding use of elevators

Follow Us
Follow Us:
  • लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवे नियम
  • १२ वर्षांखालील मुलांना एकट्याने वापरता येणार नाही लिफ्ट
  • १ नोव्हेंबर २०२६ पासून लिफ्टचे नवे नियम लागू
Maharashtra Lift Rules 2026: गगनचुंबी आणि बहुमजली इमारतींमध्ये लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, लिफ्टमध्ये लहान मुले अडकणे तसेच त्यांच्या सुरक्षेबाबत दुर्घटना घडण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सोशल मीडियावरही लहान मुले लिफ्टमध्ये एकटी असताना घडलेल्या दुर्घटनांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकच्या वापराबाबत नवी सुरक्षा नियमावली लागू केली आहे.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, यापुढे १२ वर्षांखालील लहान मुलांना पालकांशिवाय किंवा मोठ्या व्यक्ती सोबत असल्याशिवाय लिफ्टचा वापर करण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून ‘महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉक, २०२६’ ही नवी नियमावली लागू झाली आहे. त्यामुळे आता लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जाण्यास किंवा एस्केलेटर वापरण्यास परवानगी असणार नाही. या नियमांमुळे गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारती आणि लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांवरही मोठी जबाबदारी आली आहे.

Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल

मुंबई. ठाणे व पुण्यासारख्या वाढत्या शहरांमध्ये इमारतीची उंची आणि मजल्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे.  मोठमोठ्या इमारती आणि गगनचुंबी संकुलांची वाढ झाल्याने लिफ्टचा वापर वाढला आहे. मात्र अनेकदा याचा फटका लहान मुलांना बसत असल्याने यापुढे योग्य ती काळजी घेण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून ‘महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉक, २०२६’ ही नवी नियमावली लागू झाली आहे.

‘मुंबई विकायला काढली आहे का?’; महापालिकेतील बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

नव्या नियमांनुसार, लिफ्ट किंवा एस्केलेटरचा वापर करताना १२ वर्षांखालील मुलांसोबत पालक किंवा एखादी मोठी व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जाण्यास किंवा एस्केलेटर वापरण्यास परवानगी असणार नाही. याशिवाय लिफ्ट किंवा एस्केलेटरशी संबंधित कोणताही अपघात झाल्यास त्याची माहिती २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोब लिफ्टमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंचलित बचाव उपकरणे बसवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

या नव्या नियमांमुळे गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारतींचे व्यवस्थापन तसेच लिफ्टची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांवरही सुरक्षिततेची मोठी जबाबदारी आली आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकांनीही लिफ्टचा वापर करताना अधिक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र सरकारकडून लिफ्टबाबत कोणते नियम जाहीर झाले?

    Ans: नव्या नियमांनुसार १२ वर्षांखालील मुलांसोबत पालक किंवा एखादी मोठी व्यक्ती असणे आवश्यक आहे.

  • Que: लिफ्ट किंवा एस्केलेटरचा अपघात झाल्यास काय करावे लागेल?

    Ans: लिफ्ट किंवा एस्केलेटरशी संबंधित अपघाताची माहिती २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे.

  • Que: लिफ्टच्या सुरक्षेसाठी नवीन नियमांमध्ये कोणत्या सुविधा आवश्यक आहेत?

    Ans: लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंचलित बचाव उपकरणे बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra lift escalator new rules 2026 children safety by state government nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Government Decision
  • maharashtra news
  • safety tips

संबंधित बातम्या

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम
1

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल
2

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
3

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Satara District Bank Election:  सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार : जयकुमार गोरे
4

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार : जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.