
निवडणुकीच्या आखाड्यात 'एआय' अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु
टोनी स्टार्क (आयर्न मॅन), थानोस, स्पायडरमॅन आणि हल्क यांसारख्या प्रसिद्ध पात्रांना चक्क मुंबईच्या निवडणुकीच्या रिंगणात एआयच्या माध्याने एकप्रकारे प्रचाराला उतरवले आहे. हे सुपरहिरोज मुंबईच्या विकासावर आणि समस्यांवर भाष्य करत असून, सोशल मीडियावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील मतदारांत या कल्पकतेमुळे भाजपबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली आहे. इतर पक्षांनीही या ट्रेंडचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अचूकता आणि संदेशाची स्पष्टता यामुळे भाजप या शर्यतीत ‘एंडगेम’च्या फायनल टचपर्यंत पोहोचले आहे. “भूलथापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही” या घोषणेद्वारे मतदारांना एक खंबीर पर्याय दिला आहे. ही घोषणा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता, ती प्रत्येक बॅनर, पोस्टर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकसमान पद्धतीने मांडली जात आहे.
अटेंशन इकॉनॉमिक्स: भाजपची सरशी
भाजपने लांबलचक भाषणांपेक्षा ‘शेअरेबल’ आणि ‘रिकॉल व्हॅल्यू’ असलेले कंटेंट तयार केला आहे. इन्स्टाग्राम रील्स, व्हॉट्सॲप स्टेटस आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून मेसेज प्रत्येक मुंबईकराच्या मोबाईलवर पोहोचत आहेत. ‘मार्व्हल’च्या सुपरहिरोजप्रमाणेच भाजपने मुंबईच्या राजकीय पटलावर आपली पकड घट्ट केली असून, विरोधकांच्या भूलथापांना मुंबईकर बळी पडणार नाहीत, हेच या निवडणुकीचे भाजपचे मुख्य सूत्र ठरताना दिसत आहे.