BJP Politics: Amit Satam appointed as Mumbai BJP city president, replacing Ashish Shelar
Amit Satam appointed as Mumbai BJP city president : भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपने मुंबईत मोठा खांदेपालट केला आहे. मुंबई भाजपचे शहर अध्यक्षपदावरून आशिष शेलार यांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुन्हा राजकारण तापले, मनोज जरांगेना गिरीश महाजनांचा मोला
“कोकणाशी नाळ जोडलेले आणि पक्के मुंबईकर असलेले आमचे मित्र आणि तरुण तडफदार आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्ष पदी आज नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन !! नागरी चळवळीतून आलेल्या आणि संघर्ष आणि सेवा हाच ज्याचा ध्यास आहे अशा पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा !!” असे ट्विट करत आशिष शेलार यांनी अमित साटम यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच, “मला तीन टर्म म्हणजे एकूण नऊ वर्षे मुंबईकरांची सेवा करण्याची संधी ही पक्षाने दिली. या कालखंडात पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी आणि तमाम मुंबईकर यांनी मला खूप प्रेम दिले. सहकार्य केले, लढण्यासाठी ऊर्जा दिली, नवी ओळख दिली आणि जगण्याची एक दिशा दिली. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो !” अशा भावनाही आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अमित साटम मुंबई पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केलं आहे. गेल्या तीन टर्मपासून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. मुंबईतील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसबा आणि प्रत्येक व्यासपीठावर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडली आहे. अमित साटम यांच्या कामाची दखल घेत भाजपने त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला आहे.
Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण करत नाही? काय आहे यामागील पौराणिक कारण
अमित साटम हे भाजपचे आमदार असून २०१४ पासून ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. अमित साटम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, आणि 2000 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (कार्मिक) ची पदवी घेतली, पदवी मिळवली.
अमित साटम यांच्या नियुक्तीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजपर्यंत आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. २०१७ च्या निवडणुका असो आताच्या निवडणुका असोत. आशिष शेलारांनी उत्तम काम केलं. मंगलप्रभात लोढा यांनीही उत्तम कार्यभार सांभाळला. आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा जबाबदारी आली. विधानसभेतही चांगले यश मिळाले. मुंबईतील पहिल्या क्रमांकांचा पक्ष म्हणून त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
फडणवीस म्हणाले, भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेत अमित साटम यांच्यावर मोठा भार सोपवण्यात आला आहे. तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, नगरसेवक म्हणून कार्य केलेले आणि प्रदीर्घ राजकीय कार्यकाळ असलेले साटम यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत घोडदौड राखेल. महायुतीची सत्ता पुन्हा मुंबईत येईल, असा मला विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते उत्तमरीत्या पार पाडतील. त्यांच्यामागे सर्व ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे. अमित साटम यांना मनःपूर्वक शुभेच्छा,” असेही फडणवीस म्हणाले.