
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ४१ (ए) (सुधारित), कलम २६ (२), कलम ३० व ३४ (एम) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, अध्यक्ष, शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी या नियमांचे आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून जारी निर्देशांनुसार, निवासी इमारती, इमारतींचे टेरेस, गच्ची, बाल्कनी, अंगणे, वाहनतळ, झोपडपट्टी क्षेत्रे तसेच इतर सर्व परिसरांना ही बंदी लागू राहणार आहे. हे आदेश दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ पासून दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित परिमंडळीय पोलीस उपायुक्त, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभागांचे (वार्ड ऑफिस) सहायक आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Mumbai News: फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाली? मुलांसाठी एएसजी हॉस्पिटलचा मदतीचा हात!
फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट
फटाक्यांच्या पाकिटांवर त्यांची ध्वनिपातळी, रासायनिक घटक आणि क्यूआर कोडची माहिती देणे बंधनकारक असतानाही बाजारात विकल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच अविश्वसनीय असल्याचा गंभीर मुद्दा आवाज फाउंडेशनने उपस्थित केला आहे. काही फटाक्यांच्या पाकिटांवर क्यूआर कोड नसतात, तर काहींवर बनावट क्यूआर कोड आढळले आहेत. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रासायनिक चाचण्यांमध्ये बंदी असलेल्या आणि आरोग्यास घातक अशा बेरियमचा अंश आढळल्याचा दावा फाउंडेशनने केला आहे.