Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali In USA: ‘मामदानींनी रांगोळी काढली, अब्दुल सय्यद यांनी दिवा लावला’, अमेरिकन मुस्लिम नेत्यांची मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी

Diwali In USA : भारतासह जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अमेरिकेतील भारतीय समुदायाने दिवाळी साजरी केली. अमेरिकन नेत्यांनीही दिवाळीच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 09, 2026 | 04:30 PM
Zohran Mamdani Diwali Celebration Abdul El Sayed Senator Diwali

Zohran Mamdani Diwali Celebration Abdul El Sayed Senator Diwali

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन मुस्लिम नेत्यांचा दिवाळी उत्साहात सहभाग
  • रांगोळी आणि दिव्यांची आरास
  • दोन्ही नेत्यांचे भारताशी खास नाते

जगभरात दिवाळीचा सण अतिशय आनंदात आणि रोषणाईच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रकाशोत्सवाचा उत्साह केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही (Diwali In USA) मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. अमेरिकेतील भारतीय समुदायाने एकत्र येत दिवाळीचे भव्य आयोजन केले होते, परंतु यावर्षीच्या दिवाळी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते अमेरिकेतील दोन प्रमुख तरुण मुस्लिम नेते न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी आणि मिशिगनमधून निवडून आलेले नवनिर्वाचित सिनेटर अब्दुल अल सय्यद. या दोन्ही नेत्यांनी भारतीय बांधवांसोबत एकत्र येत दिव्यांची आरास केली, रांगोळ्या सजवल्या आणि सणाचा मनमुराद आनंद लुटला.

 झोहरान ममदानी रांगोळी काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर ठरलेले झोहरान ममदानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिवाळी साजरी करतानाचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते अतिशय आनंदाने घराच्या अंगणात आणि पायऱ्यांवर झेंडूच्या फुलांनी, दिव्यांनी सजावट करताना दिसत आहेत. व्हिडिओतील सर्वात खास गोष्ट म्हणजे ममदानी यांनी स्वतः जमिनीवर बसून सुंदर आणि रंगीबेरंगी रांगोळी तयार केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jensen Huang: टेक विश्वात खळबळ! Nvidia CEO अडकले चिनी गुप्तहेरगिरीच्या जाळ्यात; अब्जावधी डॉलर्सची चिप खरेदी करून अमेरिकेची…

डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाचे नेते असलेल्या झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची सूत्रे हाती घेत इतिहास रचला आहे. ते केवळ न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौरच नाहीत, तर गेल्या १०० वर्षांतील सर्वात तरुण आणि पहिले दक्षिण आशियाई वंशाचे महापौर ठरले आहेत. ममदानी यांचा भारताशी अतिशय जवळचा संबंध आहे. त्यांच्या आई प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आहेत. यामुळेच भारतीय सण आणि संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात नेहमीच एक आत्मीयतेचे स्थान राहिले आहे.

New York Mayor Zohran Mamdani, sporting a yellow kurta, lights a lamp celebrating Diwali https://t.co/M8A47WXC5B — Shashank Mattoo (@MattooShashank) November 8, 2026

credit – social media and Twitter

 नवनिर्वाचित सिनेटर अब्दुल अल सय्यद यांनी लावले दिवे; भारत कनेक्शनची जोरदार चर्चा

दुसरीकडे, अमेरिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून देशातील पहिले मुस्लिम सिनेटर बनलेले अब्दुल अल सय्यद यांनीही दिवाळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते पारंपरिक पद्धतीने मातीचा दिवा लावताना, हसताना आणि भारतीय बांधवांसोबत टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

Happy Diwali to all who celebrate the Festival of Light🪔🎇 https://t.co/1PTGjRw53K — Dr. Abdul El-Sayed (@AbdulElSayed) November 8, 2026

credit – social media and Twitter

अब्दुल अल सय्यद यांच्या निवडणुकीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. राजकीय विरोधकांच्या अत्यंत तीव्र वैयक्तिक आणि राजकीय हल्ल्यांना तोंड देत त्यांनी मिशिगनमधून दणदणीत विजय संपादन केला. अब्दुल यांचे आई-वडील मूळचे इजिप्तचे असले, तरी त्यांची पत्नी सारा झुक्काकू या भारतीय वंशाच्या आहेत. सारा यांच्या कुटुंबाचे मूळ नाते भारतातील कर्नाटक राज्यातील भटकळ भागाशी आहे. सारा यांचे आजोबा आपल्या काळातील एक प्रख्यात वकील आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री होते. या कौटुंबिक नात्यामुळे अब्दुल सय्यद यांनी भारतीय संस्कृतीतील या महत्त्वाच्या सणात मनापासून सहभाग नोंदवला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Donald Trump: ‘मला नरकात जायचे नाही, मी धार्मिक व्यक्ती आहे…’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मुलाखतीमुळे जगभरात चर्चांना उधाण

व्हाईट हाऊसमध्येही रंगला दिवाळीचा सोहळा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्येही भारतीय समुदायासाठी विशेष दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सोहळ्याला अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा, जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना आणि कॅनडाच्या माजी खासदार रुबी धल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा गेल्या दोन दशकांपासून अविरतपणे सुरू आहे. या परंपरेची सुरुवात २००३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये बराक ओबामा हे व्हाईट हाऊसच्या अधिकृत परिसरात स्वतःच्या हाताने पारंपरिक दिवा लावणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. यावर्षीही अमेरिकेतील सर्वोच्च प्रशासकीय स्तरावर दिवाळीचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी दिवाळी कशी साजरी केली?

    Ans: झोहरान ममदानी यांनी आपल्या घरी स्वतःच्या हाताने आकर्षक रांगोळी काढली, दिवे लावले आणि भारतीय समुदायासोबत अतिशय उत्साहात दिवाळी साजरी केली.

  • Que: अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर अब्दुल अल सय्यद यांचे भारताशी काय नाते आहे?

    Ans: सिनेटर अब्दुल अल सय्यद यांच्या पत्नी सारा झुक्काकू या भारतीय वंशाच्या असून त्या भारतातील कर्नाटक राज्यातील आहेत.

  • Que: व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा कधी सुरू झाली?

    Ans: व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा २००३ मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या काळात सुरू झाली.

Web Title: Zohran mamdani abdul el sayed celebrate diwali in usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • America
  • Diwali 2026
  • Muslim Community
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US War : ‘युद्ध थांबवा, आम्ही 48 तासांत होर्मुझ उघडू, नाहीतर विनाश होईल…’; इराणचा अमेरिकेला अंतिम इशारा
1

Iran-US War : ‘युद्ध थांबवा, आम्ही 48 तासांत होर्मुझ उघडू, नाहीतर विनाश होईल…’; इराणचा अमेरिकेला अंतिम इशारा

Gaza Floods: गाझामध्ये पुराचा  हाहाःकार! 70 हजार विस्थापितांचे तंबू उद्ध्वस्त, कडाक्याच्या थंडीत लाखो नागरिक उघड्यावर
2

Gaza Floods: गाझामध्ये पुराचा हाहाःकार! 70 हजार विस्थापितांचे तंबू उद्ध्वस्त, कडाक्याच्या थंडीत लाखो नागरिक उघड्यावर

Bhau Beej 2026: भाऊबीज का साजरी केली जाते? यमराज-यमुना आणि श्रीकृष्ण-सुभद्रेच्या पौराणिक कथा जाणून घ्या
3

Bhau Beej 2026: भाऊबीज का साजरी केली जाते? यमराज-यमुना आणि श्रीकृष्ण-सुभद्रेच्या पौराणिक कथा जाणून घ्या

Donald Trump: ‘मला नरकात जायचे नाही, मी धार्मिक व्यक्ती आहे…’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मुलाखतीमुळे जगभरात चर्चांना उधाण
4

Donald Trump: ‘मला नरकात जायचे नाही, मी धार्मिक व्यक्ती आहे…’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मुलाखतीमुळे जगभरात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.