Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! निशिकांत शिंदेंनी बालेकिल्ला राखला, समाधान सरवणकरांचा दारुण पराभव

Municipal Election Result 2026: मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचा गड राखला. शिंदे यांनी मिंधे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा दारुण पराभव केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 16, 2026 | 01:21 PM
दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! निशिकांत शिंदेंनी बालेकिल्ला राखला, समाधान सरवणकरांचा दारुण पराभव

दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! निशिकांत शिंदेंनी बालेकिल्ला राखला, समाधान सरवणकरांचा दारुण पराभव

Follow Us
Close
Follow Us:

Municipal Election Result 2026 News Marathi : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात सुरु आहे. यासाठी २,२९९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याचदरम्यान मुंबई महानगरपालिकेत दादरमधील १९४ प्रभागातून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दादरमध्ये होल्ड असल्याचं म्हटलं जाणार शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी मोठा धक्का बसला आहे. समाधान सरवणकर हे सदा सरवणकरांचे पूत्र असून त्यांनी १९४ प्रभागातून निवडणूक लढवली होती. यात समाधान सरवणकर पराभूत झाले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे निशिंकात शिंदे विजयी झाले आहे. दादरमध्ये हाय व्होल्टेज प्रभागांत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १९४ मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव केला. सरवणकर कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने मारलेली ही मुसंडी शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

PMC Elections 2026 : पुण्यात कॉंग्रेसचे खाते उघडले! पवारांना सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप विजयी

आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांपैकी भाजपने ६६ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे गट ५४ जागांवर, काँग्रेस ५ आणि मनसे आघाडी ५ जागांवर आघाडीवर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत, मुंबई महानगरपालिकेत ठाकरे भाजपला काँटे की टक्कर देत आहेत.

समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर, ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी शपथ घेतली होती की सरवणकर नाव प्रभादेवीमधून पुसून टाकेन. ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला, त्यांना जनतेने धडा शिकवला. मी 2017च्या महापालिका निवडणुकीत नारळ घेऊन उभा होतो, त्यावेळेस मी हरलो. तेव्हा त्यांनी माझ्या घरासमोर नारळ फोडले होते, आज मी त्यांच्या हातात नारळ देणार.’

Municipal Election Result 2026 : निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात! रोहित पवारांनी पकडली मोठी चूक

Web Title: Bmc election 2026 sada saravankars son samadhan saravankar defeated thackeray groups nishikant shinde wins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

PMC Election Result 2026: पुणेकरांनी मोडली ‘दादागिरी’; अजित पवार झाले ‘फ्री’, पराभवाची कारणे काय?
1

PMC Election Result 2026: पुणेकरांनी मोडली ‘दादागिरी’; अजित पवार झाले ‘फ्री’, पराभवाची कारणे काय?

Sanjay Shirsat: मतमोजणी बाहेर शिवसेना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज , मंत्री शिरसाट यांची पोलिसांवर जोरदार टीका
2

Sanjay Shirsat: मतमोजणी बाहेर शिवसेना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज , मंत्री शिरसाट यांची पोलिसांवर जोरदार टीका

BMC Elections 2026 : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का
3

BMC Elections 2026 : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का

Municipal Corporation Election 2026 : इतिहास घडवणारा विजय! मुंबई, पुणे, नागपूर…, प्रत्येक शहरात भाजपची लाट, श्रेय कोणाला मिळणार?
4

Municipal Corporation Election 2026 : इतिहास घडवणारा विजय! मुंबई, पुणे, नागपूर…, प्रत्येक शहरात भाजपची लाट, श्रेय कोणाला मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.