पुण्यामध्ये कॉंग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचा वानवडी – साळुंखेविहार मतदारसंघातून विजय झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ (वानवडी – साळुंखेविहार) या प्रभागातून प्रशांत जगताप उमेदवार होते. त्यांनी विजयश्री खेचून आणत पुण्यात काँग्रेसचे खाते उघडले आहे. प्रशांत जगताप यांच्याविरोधात भाजपची कडवी लढाई होती. मात्र यानंतर देखील प्रशांत जगताप यांनी पूर्ण ताकदीने लढत दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. यामुळे पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा प्रशांत जगताप यांची राजकीय ताकद दिसून आली आहे.
हे देखील वाचा : निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात! रोहित पवारांनी पकडली मोठी चूक
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते. त्याच भाजपाचे उमेदवार अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. प्रशांत जगताप हे पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होते. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर प्रशांत जगताप यांनी शरद पवार गटाच्या पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न केले. मात्र पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप हे या युतीमुळे नाराज होते. यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली आणि विजय देखील मिळवला आहे.
हे देखील वाचा : पिंपरी चिंचवडचा “दादा’ कोण होणार? मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप आघाडीवर
पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांची उमेदवारी देण्यावेळी मोठी चर्चा रंगली होती. प्रशांत जगताप हे पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराज होते. शहराध्यक्ष नाराज असल्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटासोबत असलेल्या युतीचा घाट मोडणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्णय घेत नाराजी ही घरी असते पक्षामध्ये नाही असे म्हणत प्रशांत जगताप यांच्या नाराजीवर ताशेरे ओढले. यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत प्रशांत जगताप यांनी जोरदार प्रचार केला. प्रशांत जगताप यांचा आता विजय झाला असून यामुळे कॉंग्रेसचे विजयी खाते उघडले आहे.






