
BMC Election Result 2026: निकालाची घडी जवळ! 23 कक्ष सज्ज, कडक पोलिस बंदोबस्तात होणार मतमोजणी
NMMC Election 2026: टांगा कोणाचा पलटी होणार? कोणाच्या बाजूने लागणार निकाल? नवी मुंबईत वाढली उत्सुकता
भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक मतमोजणी कक्षाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सार्वत्रिक निवडणुका 2025–2026 मधील एकूण 227 प्रभागांसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच मतमोजणीसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून यानुसारच काम करण्याचे आदेश देखील दिले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर आज 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतर्गत मतमोजणीसाठी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि पोलिस विभागाकडून आवश्यक मान्यता मिळाल्या आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे.
महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कर्तव्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त (कर निर्धारण आणि संकलन) विश्वास शंकरवार, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (कोकण विभाग) फारोग मुकादम, सहाय्यक आयुक्त (कर निर्धारण आणि संकलन) गजानन बेल्लाले, उपजिल्हा दंडाधिकारी महादेव किरवले आणि इतर 23 निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) उपस्थित होते. महापालिका आयुक्त गगराणी यांनी यांनी सांगितलं आहे की, निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.