Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवादरम्यान डीजे, लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांमुळे होणाऱ्या कथित ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा बॉम्बे हायकोर्टात पोहोचला आहे. दाखल जनहित याचिकेत 2016 मधील हायकोर्टाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2026 | 06:49 PM
अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा बॉम्बे हायकोर्टात
  • 2016च्या आदेशांचे पालन करण्यासाठी जनहित याचिका
  • रात्रीच्या नियमांच्या अंमलबजावणीची मागणी
Ganeshotsav 2026: महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा संस्कृतीचा परंपरेचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. त्यामुळे या काळात बाप्पाच्या मिरवणुकीत डीजे. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाज असतो. गणेशोत्सवादरम्यान डीजे, लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा बॉम्बे हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा दावा करत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत गणेशोत्सवासह आगामी उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

2016च्या निर्णयाचा याचिकेत संदर्भ

याचिकेत डॉ. महेश विजय बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणातील 2016च्या बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. या निर्णयात Noise Pollution (Regulation and Control) Rules ची अंमलबजावणी बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. लाऊडस्पीकर किंवा पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम वापरण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची लेखी परवानगी आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते.

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत काय नियम?

न्यायालयाच्या निर्णयानुसार सामान्यतः रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत लाऊडस्पीकर, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम किंवा ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध आहेत. मात्र, राज्य सरकार वर्षातील जास्तीत जास्त 15 अधिसूचित सण-उत्सवांच्या दिवशी रात्री 10 ते 12 पर्यंत मर्यादित सवलत देऊ शकते. अशा सवलतीच्या काळातही निर्धारित ध्वनिमर्यादा पाळणे आवश्यक आहे.

साइलेंस झोनमध्ये कठोर नियम

रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरातील साइलेंस झोनसाठी अधिक कठोर नियम लागू होतात. 2016च्या निर्णयात खुल्या साइलेंस झोनमध्ये लाऊडस्पीकर तसेच ढोल किंवा अन्य वाद्यांच्या वापरासंबंधी निर्बंध स्पष्ट करण्यात आले होते.

प्रत्यक्ष अंमलबजावणीवर याचिकेत प्रश्न

याचिकाकर्त्याने नियम अस्तित्वात असूनही प्रत्यक्षात त्यांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि साइलेंस झोनमध्ये ठरवून दिलेल्या ध्वनिमर्यादांचे पालन व्हावे आणि उल्लंघनाच्या तक्रारींवर प्रभावी कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 2016च्या निर्णयानुसार निवासी भागासाठी दिवसा 55 आणि रात्री 45 dB(A), तर साइलेंस झोनसाठी अनुक्रमे 50 आणि 40 dB(A) मर्यादा नमूद आहेत. दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात महाराष्ट्रातील ध्वनी नियमांच्या अंमलबजावणीमुळे डीजे आणि मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

Web Title: Bombay high court pil over noise pollution during ganeshotsav dj loudspeaker dhol tasha rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
1

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात
2

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
3

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
4

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.