Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! खर्च तिप्पट झाल्यास मंत्रिमंडळ मंजुरी बंधनकारक; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीही महत्त्वपूर्ण

सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मोठ्या खर्चाच्या विकासप्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यापूर्वी आर्थिक बाबींची अधिक सखोल पडताळणी केली जाणार आहे. तसेच प्रकल्पांचा वाढता खर्च, कामांना होणारा विलंब आणि त्यामागील कारणे याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांना तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 01, 2026 | 08:22 PM
मोठी बातमी ! खर्च तिप्पट झाल्यास मंत्रिमंडळ मंजुरी बंधनकारक; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीही महत्त्वपूर्ण

मोठी बातमी ! खर्च तिप्पट झाल्यास मंत्रिमंडळ मंजुरी बंधनकारक; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीही महत्त्वपूर्ण

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र सरकारने राज्यातील विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्याच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आहेत.
  •  

    रस्ते, महामार्ग, पूल, रेल्वे, विमानतळ आणि धरणांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.

  •  

    पाणीपुरवठा योजना, जलसाठे, मलनिस्सारण प्रकल्प आणि शासकीय इमारतींच्या बांधकामांचाही या निर्णयात समावेश आहे.

मुंबई : राज्यातील विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्याच्या पद्धतीत सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. रस्ते, महामार्ग, पूल, रेल्वे, विमानतळ, धरणे, जलसाठे, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण प्रकल्प तसेच शासकीय इमारतींच्या बांधकामांसह विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात लागू करण्यात आली आहेत. संबंधित लेखाशीर्षांतर्गत मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये झालेला प्रत्यक्ष खर्च आणि प्रस्तावित कामांमुळे निर्माण होणारे एकूण आर्थिक दायित्व यांचा विचार करून मंजुरीची पातळी निश्चित केली जाणार आहे.

यासंदर्भात नियोजन विभागाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी ५ जून २०२६ रोजी लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये नव्याने बदल करण्यात आले आहेत. संबंधित लेखाशीर्षाखाली मागील तीन वर्षांच्या सरासरी खर्चाच्या तुलनेत आधीची आर्थिक बांधिलकी आणि नव्याने प्रस्तावित कामांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा प्रस्तावांची उच्चस्तरीय छाननी करूनच निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन तरतुदीनुसार, संबंधित लेखाशीर्षाखालील मागील तीन वर्षांच्या सरासरी प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत विद्यमान दायित्व आणि नव्या प्रस्तावाची एकत्रित किंमत तीनपट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास संबंधित प्रशासकीय विभागाला मंत्रिमंडळ अथवा मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मंजुरी घेणे अनिवार्य असेल.

प्रस्तावासोबत विश्लेषणही सादर करावे लागणार

प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविताना मागील तीन आर्थिक वर्षांतील सरासरी प्रत्यक्ष खर्च, सध्याचे आर्थिक दायित्व, प्रस्तावित नवीन कामांचा खर्च, मंजूर झालेल्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील खर्च तसेच अपूर्ण कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला उशीर, त्यामागील कारणे, खर्चात झालेली वाढ आणि त्यासंदर्भातील सविस्तर विश्लेषणही प्रस्तावासोबत सादर करावे लागणार आहे.

नव्या निकषांनुसार प्रशासकीय मान्यता

सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रकरणांमध्ये वित्त विभागाने २ जून २०२६ रोजी जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्व विकासकामांचे प्रस्ताव ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या दृष्टिपत्रातील उद्दिष्टे आणि तरतुदींशी सुसंगत असणे आवश्यक असल्याचे शासनाने नमूद केले आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मोठ्या खर्चाच्या विकासप्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यापूर्वी आर्थिक बाबींची अधिक सखोल पडताळणी केली जाणार आहे. तसेच प्रकल्पांचा वाढता खर्च, कामांना होणारा विलंब आणि त्यामागील कारणे याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांना तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

FAQ (Frequently Asked Questions)

१. महाराष्ट्र सरकारने विकासकामांच्या मंजुरी प्रक्रियेत कोणता बदल केला आहे?

विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.

२. कोणत्या विकासकामांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार आहेत?

रस्ते, महामार्ग, पूल, रेल्वे, विमानतळ, धरणे, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण प्रकल्प आणि शासकीय इमारतींच्या बांधकामांना ही तत्त्वे लागू होणार आहेत.

३. विकासकामांच्या मंजुरीची पातळी कशी निश्चित केली जाणार आहे?

मागील तीन आर्थिक वर्षांतील प्रत्यक्ष खर्च आणि प्रस्तावित कामांमुळे निर्माण होणारे एकूण आर्थिक दायित्व विचारात घेतले जाणार आहे.

Web Title: Cabinet approval becomes mandatory if costs triple nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Pune News : पुण्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात पीएम किसानचे १,९३७ कोटी, ४.३४ लाख शेतकरी पात्र
1

Pune News : पुण्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात पीएम किसानचे १,९३७ कोटी, ४.३४ लाख शेतकरी पात्र

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अरुण फरेरांना दिलासा, २०११ मधील अटक बेकायदेशीर, महाराष्ट्र सरकारला २ लाखांची भरपाई देण्याचे निर्देश
2

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अरुण फरेरांना दिलासा, २०११ मधील अटक बेकायदेशीर, महाराष्ट्र सरकारला २ लाखांची भरपाई देण्याचे निर्देश

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!
3

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर
4

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.