Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील ॲप आधारित टॅक्सी सेवांवर आता डिजिटल देखरेख ठेवण्याची तयारी सुरू आहे. वाहनं, चालकांची कागदपत्रं, ड्युटीचे तास आणि राइड वाटपाची प्रक्रिया एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 29, 2026 | 06:36 PM
AI Digital Platform for app based taxi

AI Digital Platform for app based taxi

Follow Us
Follow Us:
  • चालकांची माहिती, कागदपत्रं आणि ड्युटीचे तास एकाच प्लॅटफॉर्मवर
  • राइड वाटपातील भेदभाव शोधण्यासाठी अल्गोरिदमची तपासणी
  • प्रवाशांची सुरक्षा आणि स्वतंत्र टॅक्सीचालकांच्या हक्कांना प्राधान्य
 

मुंबई : राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र ॲग्रीगेटर नियमावली-2026 संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहन संख्या, स्वतंत्र टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वाहन आणि चालकांची संपूर्ण माहिती एका प्लॅटफॉर्मवर

ॲग्रीगेटर कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालविण्याचा परवाना, पोलीस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणता चालक कोणते वाहन चालवितो, याची अद्ययावत नोंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध होईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Mumbai Heritage Conservation : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी! शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे, वरळी किल्ल्याचेही संवर्धन

या प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहनांचे संचालन, चालकांच्या पाळ्या आणि अन्य महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण करता येईल. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करणे शक्य होईल.

प्रवास वाटपातील पारदर्शकतेसाठी अल्गोरिदमचे परीक्षण

ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांवर प्रवास दिला जातो, याचे परीक्षण करता येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रवास वाटपामध्ये भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासोबतच स्थानिक चालकांना रोजगाराच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रवास वाटप आणि कंपन्यांच्या कामकाजावर तांत्रिक देखरेख या बाबींना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील ॲग्रीगेटर क्षेत्राचा विस्तार आणि प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी, सक्षम आणि गतिमान नियामक यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र टॅक्सीचालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्त यांचा समतोल राखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिले.

Food Poisoning Case: एका चुकीने ओढावले ७ बालकांवर मोठे संकट! ‘ती’ गोष्ट खाल्ली अन् सुटला पालकांचा थरकाप!

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र ॲग्रीगेटर नियमावली 2026 म्हणजे काय?

    Ans: ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी तयार करण्यात येणारी नियमावली आहे. यामध्ये वाहनांची माहिती, चालकांची कागदपत्रं आणि राइड वाटपाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

  • Que: नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे टॅक्सी चालकांना काय फायदा होऊ शकतो?

    Ans: स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या कंपन्यांच्या वाहनांना राइड देताना समान संधी मिळते की नाही, हे तपासता येऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष फायदा हा नियमांची अंमलबजावणी आणि प्लॅटफॉर्मच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असेल.

  • Que: या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांची सुरक्षितता कशी वाढू शकते?

    Ans: वाहन, चालकाचा परवाना, पोलीस पडताळणी आणि ड्युटीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास तक्रार किंवा घटना घडल्यावर संबंधित माहिती लवकर मिळू शकते. AI आधारित विश्लेषणामुळे नियमभंग ओळखण्यासही मदत होऊ शकते.

Web Title: Maharashtra aggregator rules 2026 ai digital platform vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
1

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर
2

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस
3

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस

Dhule News : पाणीपुरवठा योजनेला गती द्या! १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
4

Dhule News : पाणीपुरवठा योजनेला गती द्या! १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.