Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुण्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात पीएम किसानचे १,९३७ कोटी, ४.३४ लाख शेतकरी पात्र

Pune News : पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत १,९३७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील सुमारे ४.३४ लाख शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 30, 2026 | 10:06 PM
Sunetra Pawar pune pm kisan

Sunetra Pawar pune pm kisan

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १,९३७ कोटींचा लाभ
  • जिल्ह्यात ५.७६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी
  • पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक
 

Pune News : शेतीचा खर्च भागवण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ हजार ९३७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील सुमारे ४.३४ लाख शेतकरी सध्या या योजनेसाठी पात्र आहेत.

गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन उपस्थिती लावली.

पुणे जिल्ह्यात ५.७६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी

पीएम किसान योजनेसाठी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून एकूण ५ लाख ७६ हजार २७९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सध्या सुमारे ४.३४ लाख लाभार्थी पात्र आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद! पारदर्शक कारभाराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी २ हजार रुपयांचे तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा होतात. २०१९ पासून आतापर्यंत २४ हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे.

पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक

योजनेचा लाभ नियमित मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी पूर्ण करणं आवश्यक आहे. यामध्ये ई-केवायसी, आधारशी जोडलेलं बँक खाते, जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक शेतकरी ओळख क्रमांकाची पूर्तता यांचा समावेश आहे.

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने पैसे जमा केले जातात. त्यामुळे कागदपत्रांमधील त्रुटी किंवा अपूर्ण ई-केवायसीमुळे लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

कोणत्या तालुक्याला किती कोटींचा निधी?

आंबेगाव तालुक्यात ३७ हजार २३१ लाभार्थी असून १५१ कोटी रुपये, बारामती ५० हजार ७३१ लाभार्थी व २३० कोटी रुपये, भोर २५ हजार १३७ लाभार्थी व १०४ कोटी रुपये, दौंड ४२ हजार ४२० लाभार्थी व १९५ कोटी रुपये, हवेली १० हजार ९५३  लाभार्थी व ५६ कोटी रुपये, इंदापूर ४८ हजार ७४० लाभार्थी व २१९ कोटी रुपये, जुन्नर ५२ हजार २८१ लाभार्थी व २३१ कोटी रुपये, खेड ४३ हजार ६३३ लाभार्थी व २०० कोटी रुपये, मावळ १७ हजार ४९६ लाभार्थी व ७७ कोटी रुपये, मुळशी १३ हजार ५५ लाभार्थी व ७१ कोटी रुपये, पुरंदर ३२ हजार १०८ लाभार्थी व १३३ कोटी रुपये, शिरूर ५१ हजार ५०८ लाभार्थी व २२९ कोटी रुपये, तर वेल्हा तालुक्यात ९ हजार ३४ लाभार्थी असून ४० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग समन्वयाने काम करत आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

PCMC Corruption: पिंपरी महापालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर; अभियंत्यासह ३९ जणांवर एसीबीची कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून किती निधी वितरित झाला आहे?

    Ans: पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १ हजार ९३७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

  • Que: पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला किती पैसे मिळतात?

    Ans: पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. प्रत्येकी २ हजार रुपयांचे तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा केले जातात.

  • Que: पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?

    Ans: ई-केवायसी पूर्ण करणे, आधारशी संलग्न बँक खाते असणे, जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक शेतकरी ओळख क्रमांकाची पूर्तता करणे आवश्यक आहे.

Web Title: Pune news pm kisan yojana pune district 1937 crore farmers benefit vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 10:03 PM

Topics:  

  • Farmers Issue
  • Maharashtra Government
  • PM Kisan Yojana
  • pune news

संबंधित बातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अरुण फरेरांना दिलासा, २०११ मधील अटक बेकायदेशीर, महाराष्ट्र सरकारला २ लाखांची भरपाई देण्याचे निर्देश
1

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अरुण फरेरांना दिलासा, २०११ मधील अटक बेकायदेशीर, महाराष्ट्र सरकारला २ लाखांची भरपाई देण्याचे निर्देश

Agricultural News: शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार!; विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री केल्यास थेट फौजदारी कारवाई
2

Agricultural News: शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार!; विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री केल्यास थेट फौजदारी कारवाई

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई
3

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी
4

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.