Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अरुण फरेरांना दिलासा, २०११ मधील अटक बेकायदेशीर, महाराष्ट्र सरकारला २ लाखांची भरपाई देण्याचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा यांची २०११ मधील अटक बेकायदेशीर ठरवली आहे. त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत महाराष्ट्र सरकारला २ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 30, 2026 | 07:30 PM
arun farera bombay hc

arun farera bombay hc

Follow Us
Follow Us:
  • अरुण फरेरांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले
  • पोलिसांच्या भूमिकेवर न्यायालयाने ओढले ताशेरे
  • आठ आठवड्यांत २ लाख रुपये जमा करण्याचे आदेश
 

नागपूर : पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण थॉमस फरेरा यांना २०११ मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहाबाहेर झालेली अटक बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने फरेरा यांना २ लाख रुपये भरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी कायद्याचे रक्षण करण्याऐवजी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

२७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निकालात न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

नागपूर जेलबाहेर नेमकं काय घडलं होतं?

अरुण फरेरा यांनी २०११ मध्ये अनेक प्रकरणांतून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पाऊल ठेवले. मात्र, तुरुंगाबाहेर येताच साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि एका ओळख नसलेल्या वाहनातून नेलं.

BJP PM Candidate: 2029 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? मोदी, योगी की…; अमित शाहा यांनी स्पष्टच सांगितलं

विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांची आई, भाऊ आणि वकील घटनास्थळी उपस्थित होते. तरीही पोलिसांनी त्यांना अटकेचं कारण सांगितलं नाही. उलट, फरेरा तुरुंगात असतानाही त्यांना फरार असल्याचं दाखवण्यात आल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांना सुनावलं.

अनुच्छेद २१ आणि २२ चे उल्लंघन

या कारवाईमुळे भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ म्हणजेच वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि अनुच्छेद २२ अंतर्गत अटकेसंबंधी संरक्षणाचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

नक्षलवादाशी कथित संबंध असल्यामुळे कारवाई गोपनीय ठेवावी लागली, असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला होता. मात्र, अटकेचं कारण सांगण्याची घटनात्मक जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आठ आठवड्यांत भरपाई जमा करण्याचे आदेश

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच कायद्याचं उल्लंघन केल्यास त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कारवाई झाली पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असल्याची आठवणही न्यायालयाने करून दिली. सरकारने आठ आठवड्यांच्या आत २ लाख रुपये भरपाई जमा करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय अधिक भरपाई हवी असल्यास फरेरा यांना दिवाणी दावा दाखल करण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे.

दरम्यान, फरेरा हे २०१८ मधील भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहेत.

E-100 च्या वाहनांना इंधन पुरवठा कसा करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: अरुण फरेरा यांना किती भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले?

    Ans: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र सरकारला अरुण फरेरा यांना २ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

  • Que: अरुण फरेरा यांची २०११ मधील अटक बेकायदेशीर का ठरवण्यात आली?

    Ans: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना अज्ञात वाहनातून ताब्यात घेतले. अटकेचे कारणही सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे संविधानातील अनुच्छेद २१ आणि २२ अंतर्गत त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने म्हटले.

  • Que: अरुण फरेरा कोण आहेत?

    Ans: अरुण थॉमस फरेरा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते २०१८ मधील भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहेत.

Web Title: Bombay high court arun ferreira illegal arrest compensation vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!
1

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!
2

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर
3

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर

Dhule News : पाणीपुरवठा योजनेला गती द्या! १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
4

Dhule News : पाणीपुरवठा योजनेला गती द्या! १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.