Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Megablock: कसारा मार्गावरील प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा १३ आणि १४ नोव्हेंबरला मध्यरात्री विशेष ब्लॉक

Megablock: आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा स्थानकातील अप यार्डच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे कसारा लोकलच्या वेळापत्रकात बदल होणार असून, १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 12, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ब्लॉक.
  • ब्लॉकदरम्यान खर्डी-कसारा लोकल सेवा बंद राहणार.
  • काही लोकल फेऱ्या आसनगाव आणि खर्डीपर्यंतच चालवण्यात येणार.
 

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा स्थानकातील अप यार्डचा विस्तार करण्यासाठी १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कसारा आणि खर्डी दरम्यानची लोकल वाहतूक काही काळासाठी बंद राहणार आहे.

आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा स्थानकातील अप यार्ड मार्गिकेच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. रात्री ११.१० ते मध्य रात्री १.४० या वेळेत खडर्डी-कसारादरम्यान अप मुख्य मार्ग आणि तिसऱ्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही रात्री ब्लॉकच्या कालावधीत खर्डी-कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून, काही लोकल फेऱ्या आसनगाव आणि खर्डीपर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण

१३ आणि १४ नोव्हेंबरला सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी सुटणारी शेवटची लोकल रात्री ८.४४ वाजता रवाना होईल. त्यानंतर रात्री ९.३२ वाजल्यापासून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल आसनगावपर्यंतच चालविण्यात येतील, रात्री ११.०५ वाजताची सीएसएमटी-कसारा लोकल खर्डी येथेच थांबविण्यात येईल. ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर ती कसाऱ्याच्या दिशेने रवाना होईल. कसारा येथून सीएसएमटीसाठी सुटणारी शेवटची लोकल रात्री १० वाजता रवाना होईल. ब्लॉकनंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला पहाटे ३.५१ वाजता कसारा येथून सीएसएमटीसाठी पहिली लोकल सुटेल.

ब्लॉक कालावधीत कसा होणार परिणाम

या काळात खर्डी ते कसारा दरम्यान उपनगरीय लोकल सेवा बंद राहतील. कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या आसनगाव आणि खर्डी स्थानकापर्यंतच चालवल्या जातील. या कामामुळे काही लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील किंवा  रद्द केल्या जातील.

१० मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही होणार विलंब

ब्लॉकमुळे डाउन दिशेने धावणाऱ्या १० मेल-एक्स्प्रेस गाड्या कसारा स्थानकात २० ते २५ मिनिटे थांबविण्यात येणार आहेत. १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एलटीटी-सुबेदारगंज अमृत भारत एक्स्प्रेस आणि एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे नियमन केले जाईल.

Sugarcane Workers: उसाच्या शेतांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी अन्…; राज्यमंत्र्यांचे निर्देश काय?

तसेच १३ आणि १४ नोव्हेंबर या दोन्ही मध्यरात्री सीएसएमटी-हावडा, एलटीटी-बनारस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष, एलटीटी-पाटलीपुत्र, सीएसएमटी-अमृतसर, सीएसएमटी-बनारस महानगरी आणि एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसला विलंब होईल. १४ आणि १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एलटीटी-हटिया एक्स्प्रेसचेही नियमन करण्यात येणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कसारा रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक कधी घेण्यात येणार आहे?

    Ans: मध्य रेल्वेकडून १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Que: ब्लॉकदरम्यान कसारा लोकल सेवा सुरू राहणार का?

    Ans: ब्लॉकच्या कालावधीत खर्डी-कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. काही लोकल आसनगाव आणि खर्डीपर्यंतच चालवण्यात येतील.

  • Que: मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक का जाहीर केला आहे?

    Ans: आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा स्थानकातील अप यार्ड मार्गिकेच्या विस्तारासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Web Title: Central railway block kasara asangaon november 13 14 timetable changes pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • central railway
  • Megablock
  • Megablock News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.